शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची सर्वदूर हजेरी; इगतपुरीत अतिवृष्टी

By admin | Updated: June 24, 2017 18:32 IST

आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली असून, इगतपुरी येथे अतिवृष्टी होऊन सर्वत्र जलमय वातावरण झाले तर पेठ व त्र्यंबकेश्वर येथेही दिवसभर पाऊस सुरूच राहिला. नाशिक शहरातही शनिवारी पहाटेपासून पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे शहरातील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले. दरम्यान, पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन धरणांच्या साठ्यातही वाढ होऊ लागली आहे.यंदा पाऊस सरासरी इतकाच होणार असल्याचा तसेच मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जात होती. मृग नक्षत्रात हजेरी लावून गेलेल्या पावसाने गेल्या दहा दिवसांपासून दडी मारल्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याच्या वृत्ताने सर्व सुखावलेले असताना शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी रात्रीतून ७० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. शनिवारी पहाटेपासून मात्र पावसाने सर्वत्र जोर धरला. नाशिक शहरातही सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने संततधार लावली. दिवसभर सूर्यदर्शनही दुर्लभ झाले. पावसाच्या हजेरीने हवामानात बदल झाला असून, गारवा निर्माण झाला आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा व इगतपुरी येथे दिवसभर मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत १५७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर सुरगाणा येथेही ७४ मिलिमीटर तर त्र्यंबक येथे १२० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.