शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशीही जिल्ह्यात स्वच्छतेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:59 IST

स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत जिल्ह्यात रविवारी सुटीच्या दिवशीही स्वच्छतेची कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन आढावा घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कार्यालयांची कामे सुरू होती.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : गावागावांतील कामांचा अधिकाऱ्यांकडून आढावा

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत जिल्ह्यात रविवारी सुटीच्या दिवशीही स्वच्छतेची कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन आढावा घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कार्यालयांची कामे सुरू होती.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत चालू आठवड्यात केंद्र शासनाची समिती जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्णात १ आॅगस्टपासूनच विविध उपक्र म राबविण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनाही जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. रविवार सुटीच्या दिवशी मुख्य कार्याकारी अधिकाºयांसह सर्व खातेप्रमुख, तालुकास्तरीय खातेप्रमुख, प्रत्येक गावासाठी नेमलेले संपर्क अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना भेटी देऊन सर्व कामांची पाहणी करून विविध सूचना केल्या. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना स्वच्छ सर्वेक्षण २०१८ बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने ग्रामपंचायतीमधील परिसर स्वच्छ करण्यात येत असून, भिंतींवर स्वच्छता संदेश रंगविण्यात आले आहेत. शाळा. अंगणवाडी, आठवडे बाजाराचा परिसर, मंदिर परिसर यासारख्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहेत.जिल्ह्णात पहिल्यांदा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, अंगणवाडी येथील शौचालयांची स्वच्छता करण्यात आली असून, स्वच्छ केलेल्या सर्व स्वच्छतागृहांचे फोटो स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते बघत असून, अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना तत्काळ सूचना देण्यात येत आहेत. रविवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी निफाड, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी येवला व नांदगाव, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन कामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या इतर खातेप्रमुखांनीही त्यांना नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीत भेटी दिल्या. आज अनेक गावांत आठवडे बाजार असल्याने तेथेही स्वच्छ सर्वेक्षणाबाबत तसेच प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती करण्यात आली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार