शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आऊटसोर्सिंगद्वारे शहरात साफसफाई

By admin | Updated: May 16, 2017 00:14 IST

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आता शहरातील स्वच्छतेवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आता शहरातील स्वच्छतेवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला असून, जोपर्यंत शासनाकडून सफाई कामगार भरतीला हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत आऊटसोर्सिंगद्वारे शहराची साफसफाई करण्यात येणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे, लवकरच सफाई कामगार भरतीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक मागे पडल्याने त्याचे सारे खापर आरोग्य विभागावर फोडण्यात आले आहे. त्यातच शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या खूपच कमी असल्याने कामगार भरतीसाठी लोकप्रतिनिधींसह संघटनांकडून प्रशासनाकडे रेटा वाढला आहे. शहरातील स्वच्छतेबाबत आरोग्य विभाग दररोज लोकप्रतिनिधींकडून लक्ष्य बनत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी आऊटसोर्सिंगद्वारे शहर स्वच्छ करण्याचा निर्धार बोलून दाखविला असून, लवकरच त्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सफाई कामगारांच्या भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, परंतु तोपर्यंत शहराच्या स्वच्छतेबाबत तडजोड करता येणार नाही. त्यासाठी तातडीने आऊटसोर्सिंगद्वारे साफसफाई करण्यासाठी प्रक्रिया राबविली जाईल.