इंदिरानगर : स्वच्छता पाळा आणि निरोगी राहा, प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरणाचे संतुलन राखा यांसह विविध घोषणा देत व जनजागृती करीत स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वच्छता मोहीम राबविली. पं. जवाहरलाल नेहरू जयंती शाळेच्या परिसरात स्वच्छता करून साजरी करण्यात आली. यावेळी स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक, स्वच्छता राखा यांसह विद्यार्थ्यांच्या हातातील विविध फलक सर्वांचे लक्षवेधीत होते. यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
विवेकानंद विद्यालयात स्वच्छता मोहीम
By admin | Updated: November 15, 2014 00:43 IST