नाशिक : भारत स्वच्छता अभियान मोहिमेंतर्गत आयुर्विमा महामंडळाच्या शहर शाखा क्र. ५ च्या वतीने शाखा व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारत सरकारच्या आवाहनाप्रमाणे प्रशासन अधिकारी राजन कसोटे यांनी कर्मचाऱ्यांनी शपथ देऊन केली. शाखाधिकारी विष्णू दातार यांनी साफसफाई अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन अभियानाची सुरुवात केली. शाखेतील साठलेला कचरा, धूळ, जुनी कागदपत्रे, कपाटे, संगणकीय साहित्याची साफसफाई दिवसभरात करण्यात आली. याप्रसंगी वनिता बर्वे, अर्चना एंडाईत, भारती पगार, नीलिमा सुंठवाल, अश्विनी चव्हाण, स्वप्ना लिमये, मेधा गद्रे, सुमेधा पाटील, संपदा मणेरीकर, शशिकांत महाले, विवेक धारणकर, अतुल देशपांडे, बलविंदर चौधरी आदिंनी सहभाग नोंदविला.
एलआयसी च्या वतीने स्वच्छता
By admin | Updated: October 3, 2014 01:37 IST