नाशिक : मोबाइलद्वारे सेल्फी हजेरी बंद करा, सणवार-राष्ट्रपुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या सुट्या मिळाव्यात यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सफाई कामगारांनी धरणे आंदोलन केले. सदर मागण्या त्वरित न सोडविल्यास प्रसंगी काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही सफाई कामगार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.सफाई कामगारांच्या वतीने सुरेश दलोड, सुरेश मारू, प्रवीण मारू, रमेश मकवाणा, ताराचंद पवार, रणजित कल्याणी, अजय तसांबड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. महापालिकेने नियमबाह्य मोबाइल सेल्फी हजेरी बंद करावी, सफाई कामगारांना साप्ताहिक सुट्या द्याव्यात, डॉ. आंबेडकर योजनेतील सेवानिवृत्त कामगारांना तसेच वारसांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोफत घरे द्यावीत आणि रात्रपाळीच्या जादा कामाचा मोबदला पूर्वीप्रमाणेच द्यावा, आदि मागण्यांसाठी शेकडो सफाई कामगारांनी महापालिकेच्या राजीव गांधीभवन समोर धरणे आंदोलन केले. (प्रतिनिधी)
सफाई कामगारांचे धरणे
By admin | Updated: March 18, 2016 23:56 IST