शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धीकरण केंद्रासह जलकुंभाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:13 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने जंतुमिश्रित पाणीपुरवठ्याची दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र व गावातील जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. जलकुंभाची स्वच्छता करण्यात आल्याने गुरुवारी (दि.१६) कोरडा दिवस पाळला जाणार असून, त्या दिवशी गावात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने जंतुमिश्रित पाणीपुरवठ्याची दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र व गावातील जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. जलकुंभाची स्वच्छता करण्यात आल्याने गुरुवारी (दि.१६) कोरडा दिवस पाळला जाणार असून, त्या दिवशी गावात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. नळाद्वारे चक्क जिंवत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्यात आली आहे. गावाला कणकोरीस पाचगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली असून, चास खिंडीत योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. दरम्यान, बुधवारी (दि. १५) सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच रंजना शेळके, ग्रामविकास अधिकारी एस. डी. आहिरे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे यांनी जंतुमिश्रित पाणी-पुरवठ्याची दखल घेत सकाळीच जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली व तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी तसेच खासगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने जलशुद्धीकरण केंद्रातील उपकरणांची पावडरच्या साहाय्याने स्वच्छता केली. तसेच नांदूरशिंगोटे येथील गावाला पाणीपुरवठा करणाºया दोन्हीही जलकुंभाची स्वच्छता केली.-------------------नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: दिवसभर थांबून मोहीम राबवून घेतली. पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथरोग पसरू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.जलकुंभाची स्वच्छता झाल्याने एक दिवस त्यामध्ये पाणी साठवले जाणार नाही. त्यामुळे गुरु वारी गावाला पाणीपुरवठा होणार नसल्याने महिला व ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक