शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकच्या पदरी पुन्हा निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:26 IST

निकाल घोषित : ‘दत्तक नाशिक’ची परवड, कामगिरीवर प्रश्नचिन्ह

ठळक मुद्दे यंदा ४२०० शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खराब प्रदर्शन करणा-या शहरांची यादी घोषित होणार आहे

नाशिक - मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची परवड कायम असून केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सलग तिसऱ्या वर्षी नाशिकच्या पदरी निराशा आली आहे. यंदा ४२०० शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने विशेष पुरस्कारप्राप्त शहरांची नावे घोषित केली आहे तर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खराब प्रदर्शन करणा-या शहरांची यादी घोषित होणार आहे. त्यामुळे, नाशिक आता कितव्या क्रमांकावर राहिले, एवढीच उत्सुकता उरली आहे. दरम्यान, सलग तिस-या वर्षी स्पर्धेत मार खाणाºया नाशिक महापालिकेच्या एकूणच स्वच्छताविषयक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल बुधवारी (दि.१६) घोषित झाला. त्यामध्ये महाराष्टतील ९ शहरांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांचे गाव नागपूर हे उत्कृष्ट कार्यशैली असलेले शहर ठरले आहे तर यापूर्वी सर्वात गलिच्छ शहर म्हणून घोषित झालेल्या भुसावळ शहरानेही कामगिरी उंचावली आहे. मात्र, घोषित पुरस्कारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकचा समावेश झाला नाही. मागील वर्षी महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिककडे विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा संकल्प सोडला आणि सत्ताधा-यांसह प्रशासनाला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी मेहनत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेने सर्वेक्षणापूर्वीच आठ-दहा महिने अगोदर स्पर्धेच्या निकषांनुसार स्वच्छताविषयक कामकाजाला प्रारंभ केलेला होता. शहराची एकूणच स्वच्छताविषयक स्थिती पाहता सत्ताधा-यांसह प्रशासनाकडून यंदा स्पर्धेत नाशिकची कामगिरी निश्चितच उंचावणार, असा दांडगा आत्मविश्वास व्यक्त केला जात होता. परंतु, प्रत्यक्षात देशभरात महाराष्ट दुस-या क्रमांकावर घोषित झाले असताना नाशिकच्या पदरी मात्र सलग तिस-या वर्षी निराशा आली आहे. सर्वेक्षण स्पर्धेतील सविस्तर निकालाची माहिती अद्याप उपलब्ध होेऊ शकलेली नाही. त्यामुळे, नाशिक नेमके कितव्या क्रमांकावर याचा खुलासा झालेला नाही. मात्र, सरकारनेच जाहीर केल्यानुसार आता खराब प्रदर्शन करणा-या शहरांचीच यादी जाहीर होणार असल्याने त्यात नाशिकचा क्रमांक कितवा याबाबतची उत्सुकता उरली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान