शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
2
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
3
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
4
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
5
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
6
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
7
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
8
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
9
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
10
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
11
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
12
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
13
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
14
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
15
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
16
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
17
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
18
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
19
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
20
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा

मातीसह अन्य पणत्यांनी टाकली कात

By admin | Updated: November 1, 2015 21:36 IST

नावीन्यपूर्ण पणत्यांची ग्राहकांना भुरळ

नाशिक : पारंपरिक मातीच्या पणत्यांप्रमाणेच विविध फॅन्सी, आकर्षक पणत्या बाजारात दाखल झाल्या असून, विविध रंगसंगतीतील पणत्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. शहरातील बाजारपेठेत मातीच्या पणत्यांबरोबरच, प्लॅस्टिक, अ‍ॅक्रेलिक, मेटल प्रकारातील पणत्यांची दुकाने थाटली आहेत.पारंपरिकतेची कास धरत आजही मातीच्या पणत्यांना मोठी मागणी आहे. अलीकडे ग्राहकांना चिनी बनावटीच्या वस्तूंची भुरळ पडलेली असताना पारंपरिक मातीच्या पणत्यांचं रूपडं बदलून ग्राहकांची आवड-निवड जोपासण्याच्या प्रयत्न मातीच्या पणत्या बनवणाऱ्या कारागिरांकडून केला जात आहे. मातीच्या पारंपरिक पणत्यांबरोबरच विविध आकारांतील मातीच्या पणत्यांमध्ये स्वस्तिकच्या आकारातील पणत्या, बांधणीची आकर्षक नक्षी असलेल्या पणत्या, पाच, आठ आणि अकरा पणत्यांचा एकत्रित समूह असणाऱ्या पणत्या, वर्तुळाकृती आकारातील एकावर एक असे तीन थर असलेल्या पणत्या आणि हत्तीने आपल्या सोंडेवर अलगद झेललेल्या पणत्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. मातीच्या पणत्यांपासून थोडा बदल हवा म्हणून अनेक प्लॅस्टिक, अ‍ॅक्रेलिक तसेच काचेच्या पणत्यांची खरेदी करणारा ग्राहक बघायला मिळतो. मातीच्या पणत्यांपेक्षा इतर पणत्या विविध रंगसंगतीमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने या पणत्यांचे आकर्षक रंग ग्राहकांना आकर्षित करत असल्याचे अनेक पणती विक्रेत्यांनी सांगितले.इलेक्ट्रिक लाइटच्या माळांचे तंत्रज्ञान वापरून तेल आणि वात यांचा वापर न करता रेडिमेड समई आणि पणत्यादेखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. समई, पणत्यांप्रमाणेच उदबत्त्यादेखील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. (प्रतिनिधी)

चिनी बनावटीच्या वस्तू वापरताना सावधान

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात चिनी बनावटीच्या वस्तू दाखल झाल्या असून, या वस्तूंपासून आग लागण्याचे प्रकार, शॉर्टसर्किट असे अपघात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा वस्तू वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.