शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रणाचा दावा : १२८९ नागरिकांना नोटिसा पंधरा दिवसांत डेंग्यूचे ८२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:08 IST

शहरात गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले ८२ रुग्ण आढळून आले असून, त्याची तीव्रता ओसरत चालल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

ठळक मुद्दे१२८९ नागरिकांना नोटिसा२४८ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण६४४ संशयितांची तपासणी

नाशिक : शहरात गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले ८२ रुग्ण आढळून आले असून, त्याची तीव्रता ओसरत चालल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. दरम्यान, महापालिकेने डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन बांधकामांकडे लक्ष केंद्रित केले असून, गेल्या सहा महिन्यांत १२८९ नागरिकांना नोटिसा बजावत समज देण्यात आली आहे.शहरात स्वाइन फ्लूबरोबरच डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. राज्यात मुंबई-पुण्यानंतर नाशिक हे हिटलिस्टवर होते. आॅक्टोबर महिन्यात ४७८ संशयित रुग्णांचे नमुने तपासले असता २४८ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते, तर नोव्हेंबर महिन्यात ६४४ संशयितांची तपासणी होऊन २७६ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निदान झाले होते. मात्र, आता डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण आल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. दि. १ ते ७ डिसेंबर या कालावधीत १८७ रुग्णांचे रक्तनमुने तपासले असता ४९ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले, तर दि. ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत ९० रुग्णांची तपासणी होऊन ३३ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे आढळून आले. पंधरा दिवसांत ८२ रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेने आता पुन्हा डेंग्यूचा फैलाव होऊ नये याकरिता नवीन बांधकामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय, पंक्चर काढणाºया गॅरेजवाल्यांकडेही लक्ष पुरविले जात आहे. महापालिकेने दि. १ जून ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत १२८९ नागरिकांना नोटिसा देऊन समज दिलेली आहे. त्यात टायर-भंगार व्यावसायिक-४६५, नवीन बांधकामे- १५४, शाळा-३१, बेसमेंट- ५९, सेप्टिक टॅँक बंदिस्त करण्यासाठी १७७, तर पाणीसाठ्यांवर झाकण बसविण्यासाठी १०७ जणांचा समावेश आहे.