शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागरी आघाडीची झाली बिघाडी

By admin | Updated: January 31, 2017 00:25 IST

दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागरी आघाडीची झाली बिघाडी

इतिहास चाळतानासंजय पाठकनाशिकमध्ये महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जनआघाडीचा प्रयोग करण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही, परंतु पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीतच महापालिकेचा इतका गैरकारभार गाजला की पालिकेत नक्की काय सुरू आहे, असा सुजाण नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. टक्केवारीचे अर्थकारण, त्यावर झालेले वाद आणि न्यायालयीन दावे यामुळे महापालिका स्थापन होण्यासाठी उत्सुक असलेल्या सुजाण नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्यातून पक्षविरहित नागरी आघाडी सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार नाशिक नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष (कै.) वसंतराव गुप्ते यांच्यासह काही प्रतिष्ठित नागरिक एकत्र आले. शिंगाडा तलाव येथे प्रारंभी महापालिकेत काय चाललेय याची चर्चा करण्यासाठी बैठक झाली. ज्येष्ठ नाटककार (कै.) वसंतराव कानेटकर यांचेही मार्गदर्शन घेण्यात आले. याच बैठकीत नागरी आघाडीची सूचना काहींनी केली. ही सर्व माहिती गुप्त ठेवावी असेच या बैठकीत ठरविण्यात आले, परंतु ही ‘बातमी’ फुटली आणि गोंधळ उडाला. नागरी आघाडीमध्ये निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक तयार झाले. परंतु एका भ्रष्ट प्रकाराला आळा घालण्यासाठी सुरू झालेल्या या प्रकाराला वेगळे वळण लागले किंवा आघाडीच्या उमेदवारांनी काही गैरप्रकार केले तर कसे काय कराचये हा मुद्दा चर्चेत आला. त्यावर बरेच मंथन झाले आणि शहरातील मान्यवरांनीच मग संकल्पना मागे घेतला. ही आघाडी फसल्यानंतर आणखी एक नागरी आघाडी तयार झाली. या आघाडीने काही उमेदवार पुरस्कृत केले, परंतु कोल्हापूर महापालिकेत ज्याप्रमाणे ताराराणी आघाडी उभी राहिली तशी ही आघाडी होऊ शकली नाही. त्यानंतर महापालिकेच्या आजवरच्या इतिहास नागरी आघाडी करण्याच्या चर्चा काही अपक्ष उमेदवार करतात, परंतु त्याला फार चांगले मूर्तस्वरूप प्राप्त झाल्याचे आजवर आढळले नाही.