शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

लष्करी हद्दीचा नागरी वापर; ५४ एकर जागेची मागणी

By admin | Updated: January 20, 2017 01:22 IST

मनपाकडे प्रस्ताव : मुख्य सचिवांकडे बैठक

 नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट या लष्करी हद्दीतील काही रस्त्यांचा नागरी वापर होत असल्याने लष्कराने त्या बदल्यात सुमारे ५४ एकर पर्यायी जागेची मागणी महापालिकेकडे केली आहे. दरम्यान, महापालिकेने याबाबत असमर्थता दर्शविली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वस्तुस्थिती तपासून पाहूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्याच्या मुख्य सचिवांकडे स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत मुंबईत लष्करी अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी देवळाली कॅन्टोन्मेंटचे ब्रिगेडियर, अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. देवळाली कॅम्प आर्टिलरी रोड भागातील लॅमरोड ते अनुराधा सिनेमापर्यंतचा रस्ता तसेच कारगिल गेट ते मुंबई-आग्रा महामार्ग दरम्यानच्या रस्त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून नागरी वापर होत आहे. सदर जागा ही लष्कराने संपादित केलेली आहे. परंतु, या रस्त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीसाठी केला जात आहे. त्यात ५१.४२ एकर आणि २.२० एकर जागेचा समावेश आहे. सुमारे ५४ एकर लष्कराच्या जागेचा वापर नागरी सेवेसाठी होत आहे. त्यामुळे या जागेच्या बदल्यात महापालिकेने अन्यत्र ५४ एकर जागा लष्कराला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी जागा महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. यावेळी मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वस्तुस्थिती तपासून पाहून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)