शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिलची अग्निशमन यंत्रणा आउटडेटेड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 00:51 IST

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षामध्ये असलेली अग्निशमन यंत्रणेची (फायर एक्स्टिंग्विशर) मुदत गतवर्षी ३० एप्रिल २०२० या तारखेलाच संपुष्टात आलेली आहे. तर प्रसूती कक्षातील फायर एक्स्टिंग्विशरची मुदतदेखील त्याच दिवशी संपुष्टात आलेली असताना हे आउटडेटेड सिलिंडर त्या कक्षांमध्ये केवळ दिखाव्यासाठी असल्याचे दिसून येत आहे. भंडाऱ्याच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ह्यलोकमतह्णच्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षामध्ये असलेली अग्निशमन यंत्रणेची (फायर एक्स्टिंग्विशर) मुदत गतवर्षी ३० एप्रिल २०२० या तारखेलाच संपुष्टात आलेली आहे. तर प्रसूती कक्षातील फायर एक्स्टिंग्विशरची मुदतदेखील त्याच दिवशी संपुष्टात आलेली असताना हे आउटडेटेड सिलिंडर त्या कक्षांमध्ये केवळ दिखाव्यासाठी असल्याचे दिसून येत आहे. भंडाऱ्याच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ह्यलोकमतह्णच्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.भंडाऱ्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेत १० बालकांना जीव गमवावा लागला होता. कोणत्याही कारणामुळे लागलेली आग वेळीच लक्षात आली असती आणि तेथील कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करून ती आग रोखली असती, तरी त्या १० निष्पाप चिमुकल्यांचा जीव वाचला असता. घरी बाळ जन्मल्याच्या आनंदात असलेल्या पालकांवर टाहो फोडण्याची वेळ आली नसती. त्या पार्श्वभूमीवर ह्यलोकमतह्णने शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्ष आणि प्रसूती कक्षातील ह्यफायर एक्स्टिंग्विशरह्णची पाहणी केल्यानंतर धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या दोन्ही कक्षांमध्ये असलेल्या ५ किलो क्षमतेच्या फायर एक्स्टिंग्विशरच्या सिलिंडरची मुदत संपुष्टात येऊन ८ महिन्यांहून अधिक कालावधी उलटलेला असल्याचे दिसून आले. मुळात जिल्हा रुग्णालयासारख्या प्रचंड वर्दळ असलेल्या रुग्णालयात आणि त्यातही अत्यंत संवेदनशील अशा नवजात बालक कक्षातील यंत्रणेची मुदत संपुष्टात येईपर्यंत आणि त्यानंतरही ८ महिने सिव्हिलचे कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय कसे राहू शकतात? की इतक्या अत्यंत संवेदनशील विभागाकडे काळजीने पाहणारी किंवा मुदतीसारख्या बाबींवर देखरेख ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळामध्ये रुग्णांची अत्यंत चांगली देखभाल करण्यात आली असली तरी अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नवजात शिशूंचा जीव देखील गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nashikनाशिक