शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

शहराचा विकास आराखडा दहा दिवसांत होणार जाहीर

By admin | Updated: November 19, 2016 00:15 IST

मुख्यमंत्री : बांधकाम व्यावसायिकांना आश्वासन

नाशिक : शहराचा नवीन विकास आराखडा येत्या दहा दिवसांत जाहीर करण्यात येणार असून, शहरातील बांधकाम क्षेत्रापुढील विविध प्रलंबित अडथळ्यांबाबतही योग्य मार्ग काढण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के्रडाई तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित संस्थांच्या प्रतिनिधींना दिले.सिन्नर येथे जाहीर सभेप्रसंगी संबंधितांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. याबाबत क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी सांगितले, नाशिकचा प्रस्तावित विकास आराखडा लवकरच जाहीर होणार असून, या आराखड्यातील डीसीपीआरबाबत नगररचनेशी संबंधित विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या नाशिककरांच्या काही अपेक्षा आहेत. आगामी पंचवीस वर्षांतील नाशिक शहराचा विकास या आराखड्यानुसार होणार आहे. शहरात विविध तांत्रिक कारणांमुळे गेल्या दीड वर्षांपासून बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. याबाबतही तोडगा काढण्यासाठी क्रेडाई नाशिक सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यासंबंधीची चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत करण्यात आली. बांधकाम क्षेत्रापुढे असलेले विविध प्रश्न कसे हाताळावेत याबाबत नव्या विकास आराखड्याच्या डीसीपीआरमध्येच तरतूद झाल्यास झाल्यास कोणतीही संदिग्धता राहणार नाही, असे त्यांना सुचविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी शिष्टमंडळात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टचे प्रदीप काळे, आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे सचिन गुळवे, आर्किटेक्ट अविनाश कोठावदे, रसिक बोथरा, उमेश वानखेडे, उदय घुगे आदिंचा समावेश होता. (प्रतिनिधी)