शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सायकल बचावसाठी ‘सिटी रायडिंग’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:47 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट बायसिकल शेअरिंग प्रकल्पाला घरघर लागल्याने आता हा प्रकल्प वाचविण्यासाठी नाशिक सायकलिस्टने विविध उपक्रम हाती घेतले असून, नागरिकांमध्ये सायकलविषयक जागृती करण्यासाठंी येत्या २६ जानेवारीला ‘सिटी रायडिंग’ म्हणजेच सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त : स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने आयोजन

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट बायसिकल शेअरिंग प्रकल्पाला घरघर लागल्याने आता हा प्रकल्प वाचविण्यासाठी नाशिक सायकलिस्टने विविध उपक्रम हाती घेतले असून, नागरिकांमध्ये सायकलविषयक जागृती करण्यासाठंी येत्या २६ जानेवारीला ‘सिटी रायडिंग’ म्हणजेच सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.स्मार्ट सिटीच्या कार्यालयात शुक्रवारी (दि.३) पब्लिक बायसिकल शेअरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक सायकलिस्टच्या टीमची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सार्वजनिक वाहतुकीला पर्याय म्हणून सायकल चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम ठरविण्यात आले. या बैठकीस स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष रत्नाकर आहेर, उपाध्यक्ष सोफिया अंद्राडे कपाडिया यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सायकल चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ती’ (इंग्रजीत एसएचई म्हणजेच स्पोर्टस हेल्थ एन्व्हायरमेंट) या संकल्पनेवर आधारित मोहीम राबविण्यात येणार आहे. परंतु प्रत्यक्षात ती म्हणजे महिला जर या चळवळीत सहभागी असतील तर मोहीम प्रभावी ठरेल, असा विचार मांडण्यात आला. येत्या २५ जानेवारी रोजी शहरातील ‘सिटी रायडिंग’ म्हणजेच सायकलफेरी करून सायकल वापराचा संदेश देण्यात येणार आहे. याशिवाय एक दिवस वाहन विरहित घोषित करून त्यादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी फक्त सायकलचा वापर करण्यात यावा, असे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. तसेच नाशिक सायकलिस्ट असोसिएशनला यंदा नववा पेलोटेन आयोजनात स्मार्ट सिटी सहकार्य करणार आहे. या पेलोटेनला स्पर्धात्मक स्वरूप नसेल. यात ग्रीन राइड, कॉर्पोरेट राइड आणि किड्स राइड अशा प्रकारच्या सायकल स्पर्धा असणार आहेत.व्हिडीओ मेकिंग स्पर्धेची घोषणासायकल जागृती वाढविण्यासाठी स्मार्ट सिटी व्हिडीओ मेकिंग स्पर्धेची घोषणा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी केली. स्मार्ट सिटी पब्लिक बायसिकल शेअरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सायकलींच्या वापरासंदर्भातच हा व्हिडीओ बनवावा लागणार आहे. इच्छुकांनी व्हिडीओ तयार करून ते २० जानेवारीपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्मार्ट सिटी कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

टॅग्स :Cyclingसायकलिंग