शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक  शहरात  तपमानाचा पारा ३८ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:50 IST

शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, सोमवारी (दि. १६) कमाल तपमान अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले असून, दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वाहनांसह नागरिकांची वर्दळही विरळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

नाशिक : शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, सोमवारी (दि. १६) कमाल तपमान अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले असून, दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वाहनांसह नागरिकांची वर्दळही विरळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.  शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकचे तपमान नेहमीच कमी नोंदवले जात असल्याने सामान्यत: तपमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे तपमान सरकले तरी नाशिककरांना उन्हाचा त्रास जाणवू लागतो. त्यात यावर्षी एप्रिल महिन्यातच तपमान ३८.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने शहरवासीयांसमोर उष्णतेचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरात शीतपेयांसह, थंड फळांनाही मागणी वाढली आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक काळजी घेताना दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी छत्री व पांढऱ्या कपड्यांचा वापर करण्यात येत आहे. अनेकजण दुपारच्या वेळी अति महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळही विरळ झाल्याचे दिसत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्येही दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. घरातून बाहेर पडताना तोंडाला कपडा बांधून व अंगभर कपडे घालून बाहर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढलीशहरातील तपमानात वाढ झाल्याने विविध भागातील शीतपेयांची दुकाने, रसाची गुºहाळे व फळांचे ज्युस सेंटरमध्ये नागरिकांची गर्दी वाढली असून, एप्रिल महिन्याच्या मध्यातच शहरातील तपमान ३८.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने नाशिककरांसमोर एप्रिलचा उत्तरार्ध व संपूर्ण मे महिना कसा जाणारा याविषयी चिंता निर्माण झाली आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, नैसर्गिक शीतपेयांसह थंड गुणधर्म असलेल्या फळांना मागणी वाढली आहे.

टॅग्स :Temperatureतापमान