शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शहरात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:53 IST

‘गुरे वासरे देती हुंबारा, नीजे गव्हानीत तारणारा, मारिया माता बाळाची माता करी जिवापाड सांभाळ, चला एकीने साजरा करूया नाताळ...’

नाशिक : ‘गुरे वासरे देती हुंबारा, नीजे गव्हानीत तारणारा, मारिया माता बाळाची माता करी जिवापाड सांभाळ, चला एकीने साजरा करूया नाताळ...’ असे नाताळ गीतगायन करत प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव ख्रिस्ती समाजबांधवांनी उत्साहात साजरा केला. यानिमित्त सकाळी ‘मिस्सा’ या सामूहिक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गर्दी उसळली होती.मानवजातीच्या कल्याणासाठी पृथ्वीतलावर अवतरलेल्या प्रभू येशूचा जन्मोत्सव अर्थात ख्रिसमसचा सण शहरात विविध धार्मिक व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील संत आंद्रिया, होली क्रॉस, सेंट थॉमस या चर्चमध्ये सकाळी सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य धर्मगुरू फादर रेव्हरंट अनंत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आंद्रिया चर्चमध्ये ‘मिस्सा’चे पठण करण्यात आले. यावेळी भाविकांच्या गर्दीने चर्च हाउसफुल्ल झाले होते. पर्यायी व्यवस्था चर्चच्या आवारात करण्यात आली होती; मात्र ती व्यवस्थाही अपुरी पडली.  संध्याकाळी साडेसहा वाजता नाताळ गीतगायनाचा कार्यक्रम चर्चच्या आवारात पार पडला. यावेळी चर्चच्या सदस्यांनी विविध नाताळ गीतांमधून प्रभू येशूंच्या जन्माचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. येशू ख्रिस्ताचे ज्येष्ठ शिष्य संत आंद्रिया यांचे नाव येथील ऐतिहासिक चर्चला देण्यात आले आहे. चर्चच्या बाहेर येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचा गव्हाणीचा देखावा सादर करण्यात आला आहे. तसेच विविध वचने प्रदर्शित करण्यात आली आहेत. मानवी जीवन सुखकारक करणारे प्रभू येशूच्या संदेशाची वचने चर्चच्या आवारात लावण्यात आली आहे.त्र्यंबक नाक्यावरील होली क्रॉस चर्चमध्ये फादर केनेथ यांच्या मार्गदर्शनाखाली द्विभाषिक ‘मिस्सा’ प्रार्थनेचे सकाळी पठण करण्यात आले. चर्च भाविकांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. यावेळी प्रार्थनेसाठी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला. यामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला होता.नाताळ गीतांची मैफलआंद्रिया चर्चमध्ये संध्याकाळी ‘युथ विथ अ व्हिजन’ ग्रुपच्या वतीने नाताळ गीतांची मैफल रंगविण्यात आली. या मैफलीत मसिहा के खयालो..., आनंदले सारे मनी..., शोर दुनिया में..., राजाओ का राजा..., विजयी हुवा विजयी हुवा..., तेरा हो अभिषेक..., असे विविध स्तुतीपर नाताळ गिते सादर करून उपस्थित शेकडो भाविकांना तल्लीन केले. चर्चच्या आवारात मंगळवारी संध्याकाळी रंगलेल्या या ‘नाताळ गीत संध्या’ सांस्कृतिक कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गायक राके श कुºहाडे, प्रतीक लोंढे, आलिशा, प्रितीशा यांना शरद वैद्य, अजय म्हस्के (की-बोर्ड), आदेश बोर्डे (ड्रम सेट) यांनी साथसंगत केली.तरुणाई सेल्फीच्या प्रेमातआंद्रिया चर्चमध्ये सादर करण्यात आलेल्या गव्हाणीचा देखावा, विद्युत रोषणाईने साकारलेले ख्रिसमस-ट्री, सायकलस्वार सांताच्या देखाव्यांसह चर्चवर करण्यात आलेल्या रोषणाईसोबत तरुणाईने ‘सेल्फी’घेत सोशल मीडियावर पोस्ट केली. संध्याकाळी मोठ्या संख्येने युवक-युवतींची गर्दी उसळली होती. आकर्षक रोषणाईने नटलेल्या चर्च परिसराची सगळ्यांनाच भुरळ पडल्याचे दिसून आले.‘मिस्सा’ प्रार्थनेसाठी गर्दीयेशू ख्रिस्ताचे ज्येष्ठ शिष्य संत आंद्रिया यांचे नाव येथील ऐतिहासिक चर्चला देण्यात आले आहे. चर्चच्या बाहेर येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचा गव्हाणीचा देखावा सादर करण्यात आला आहे. तसेच विविध वचने प्रदर्शित करण्यात आली आहेत. मानवी जीवन सुखकारक करणारे प्रभू येशूच्या संदेशाची वचने चर्चच्या आवारात लावण्यात आली आहे.४त्र्यंबक नाक्यावरील होली क्रॉस चर्चमध्ये फादर केनेथ यांच्या मार्गदर्शनाखाली द्विभाषिक ‘मिस्सा’ प्रार्थनेचे सकाळी पठण करण्यात आले. चर्च भाविकांसाठी रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. यावेळी प्रार्थनेसाठी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :ChristmasनाताळReligious programmeधार्मिक कार्यक्रम