शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोकवस्तीजवळच बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:48 IST

भगूर कॉर्नर परिसरातील बार्न्स स्कूलच्या परिसरात बिबट्याने लोकवस्तीत शिरकाव केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. येथील एका बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर बिबट्याने रात्रीच्या वेळी रुबाबदार बैठक मारल्याचे छायाचित्र सोशल मीडियातून व्हायरल झाले

देवळाली कॅम्प : भगूर कॉर्नर परिसरातील बार्न्स स्कूलच्या परिसरात बिबट्याने लोकवस्तीत शिरकाव केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. येथील एका बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर बिबट्याने रात्रीच्या वेळी रुबाबदार बैठक मारल्याचे छायाचित्र सोशल मीडियातून व्हायरल झाले असून, येथील रहिवाशांपैकी काही युवक सायंकाळी ७ वाजेपासून जागते रहो म्हणत ‘पहारेकरी’ची भूमिका बजावताना दिसून येत आहे.शिवानंदा फार्म हाउसच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भिंतीवर रात्रीच्या सुमारास बिबट्या बसलेला काही नागरिकांना दिसून आला. मल्हारबाबानगर, बार्न्स स्कूल परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने वन्यजीव मुख्य वनसंरक्षकाकडे याबाबत पाठपुरावा करून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. दोन महिन्यांपासून येथील वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने दर्शन देत काही ठिकाणी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. अनेक ठिकाणी उसाचे मळे परिसर असल्याने बिबट्यांना पोषक वातावरण आहे.देवळाली या परिसरात लष्कराची मोठी हद्द असून सुमारे २० हजार हेक्टरवर जंगल पसरलेले आहे. या जंगलात बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांचा वावर असून अनेकदा बिबटे भक्ष्याच्या शोधात जवळच्या मानवी वस्तीत शिरकाव करत असतात. येथील रस्त्याने प्रवास करत असलेल्या चारचाकी वाहनधारकाने बिबट्याचे बसलेल्या स्थितीतील फोटो काढले आहेत.देवळाली कॅम्पला एकाच दिवशी नानेगाव रोड, बार्न स्कूलसह वडनेररोडवरील सोसायटी या तीन ठिकाणी बिबट्या दिसला आहे. मात्र एक बिबट्या साधारणत: सुमारे २० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात दुसऱ्या बिबट्याला शिरकाव करू देत नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाला सहकार्य करावे. या भागात सातत्याने वनरक्षकांची गस्त असून पिंजराही लवकरच लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. ज्या नागरिकांच्या पशुधनाची बिबट्याने हानी केली आहे, त्यांना शासन नियमानुसार नुकसानभरपाई निश्चित दिली जाईल. संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ वनक्षेत्रपाल पश्चिम कार्यालयाकडे अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग