शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदारांच्या बंदने नागरिकांचे हाल

By admin | Updated: February 1, 2017 01:12 IST

आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या : वाहनकर दरवाढीच्या विरोधात चौदा संघटनांचे आंदोलन

नाशिक : केंद्रीय परिवहन विभागाने वाहन शुल्कात केलेल्या दरवाढीविरोधात शहरातील विविध चौदा वाहतूक संघटनांनी मंगळवारी (दि़३१) चक्का जाम व धरणे आंदोलन केले़ वाहतूकदारांच्या या आंदोलनाची केंद्र व राज्य सरकाने दखल न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे़  या आंदोलनामुळे शाळकरी विद्यार्थी व नोकरदार वर्गाचे हाल झाले, तर दुपारनंतर बसेस व खासगी प्रवासी वाहने सुरू झाली़ दरम्यान, आंदोलनात सहभागी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले़  प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाहतूकदारांच्या विविध संघटनांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केले़ सकाळी १० वाजेपासून सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते़ या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले, की केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमात फेरबदल केला आहे़ त्यामध्ये अन्यायकारक पद्धतीने रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो व इतर वाहनांचे विविध शुल्क व दंडामध्ये सुमारे १० ते ३० पट दरवाढ केली आहे़ ही दरवाढ करताना वाहनधारकांना विश्वासात न घेता व्यवसाय व त्यावरील उत्पन्नाचाही विचार केलेला नाही़ यामुळे व्यावसायिकांना उदरनिर्वाह करणे जिकिरीचे होणार आहे़  प्रवासी व मालवाहतूकदारांच्या या आंदोलनाची दखल न घेतल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे़  या धरणे आंदोलनात गणेश रणमाळे, मजहर सय्यद, अय्याज काझी, किरण गोसावी, किशोर लोखंडे, अली शेख, योगेश दुसाने, संजय ठाकरे आदिंसह वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़  या धरणे आंदोलनात सहभागी झालेले राज्य कृती समितीचे उपाध्यक्ष हैदर सय्यद, श्रमिक सेनेचे सुनील बागुल,भगवंत पाठक यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले़ (प्रतिनिधी)