शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट श्वानामुळे नागरिकांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:18 IST

एकलहरे : सामनगाव शिवारात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकात व विशेषत: महिला आणि लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे श्वान रात्रंदिवस पिकांमध्ये झुंडीने भटकत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोबी, फ्लॉवर, टमाटे, भेंडी या भाजीपाल्याचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामनगाव, एकलहरे येथील ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देशहरातील श्वान सोडल्याची तक्रार

एकलहरे : सामनगाव शिवारात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकात व विशेषत: महिला आणि लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे श्वान रात्रंदिवस पिकांमध्ये झुंडीने भटकत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोबी, फ्लॉवर, टमाटे, भेंडी या भाजीपाल्याचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामनगाव, एकलहरे येथील ग्रामस्थांनी केली आहे.परिसरातील सामनगाव, एकलहरेगेट, सिद्धार्थनगर, हनुमान नगर, कन्नडवाडी, देशमुखवाडी, पहाडीबाबा नगर या परिसरातील झोपडपट्टीलगत भटक्या श्वानांचा वावर वाढल्याने रहिवाशी, शेतकरी, वीज केंद्रातील कामगार यांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहे. सामनगावपासून एकलहरे गेटपर्यंत व सिद्धार्थनगर पासून चेमरी नंबर एकपर्यंत मोकाट श्वान झुंडीने फिरतात. या श्वानांच्या धाकाने एकलहरे वीज केंद्रातील कामगार चेमरी नंबर एकच्या गेटमधून ये- जा करीत असत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक नंबरचे गेट काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गेट नंबर दोनचाच वापर करावा लागत आहे.गेट नंबर दोन पासून चेमरी नंबर एकच्या गेटपर्यंत सिध्दार्थनगर, हनुमान नगर, कन्नडवाडी, पेट्रोलपंप परिसरात मोकाट श्वान झुंडीने फिरतात. महापालिका हद्दीतील मोकाट श्वान एकलहरेच्या किर्लोस्कर टेकडीजवळ सोडून दिले जातात अशी नागरीकांची तक्रार आहे.

टॅग्स :dogकुत्राcity chowkसिटी चौक