शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 16:51 IST

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वातावरणात बदल होऊन ऊन तापू लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून सूर्यदेवता आग ओकण्यात सुरुवात करत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवू लागला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही नागरिकांच्या दैनंदिन काम

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.सध्या सर्वत्र शेतीकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शिवारात सर्वत्र कांदा काढण्याचे काम जोमात आहे. परंतु कडक उन्हामुळे शेतीत काम करणारे शेतमजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. मजूर सकाळी आठ वाजता शेतात जाऊन अकरा वाजेपर्यंत काम करतात. आणि अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत शेतातील झाड्याच्या सावलीत आराम करताना दिसून येत आहे. चार वाजेनंतर पुन्हा सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात काम करतात. गाय, बकऱ्या, मेंढ्या चारणारे गुराखीसुद्धा सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी नेऊन दुपारी नदीकिनारी किंवा शेतातील झाडाच्या सावलीखाली आपली जनावरे उभी करून आराम करणे पसंत करत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळाच्या वेळेतही बदल केला आहे. दुपारी भरणारी शाळा सकाळ सत्रात केल्या आहेत. या कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेस कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. दुपारच्या वेळेस बाहेर फिरणारे नागरिक टोपी किंवा उपरणे डोक्यावर घेऊन बचाव करताना दिसत आहे. प्रचंड उखडा असल्याने दुपारच्या वेळेस पंखासुद्धा गरम हवा फेकत असल्याने लोक झाडाच्या सावलीखाली आराम करणे पसंत करीत आहेत. चालू वर्षी मार्च महिन्यातच उन्हाचा चटका बसत असल्याने एप्रिल-मे महिना कसा जाईल यांच्यावर नागरिकतिं चर्चा होत आहे.कडक उन्हामुळे अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. उन्हामुळे शेतातील पिकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली आहे. सकाळी पाणी भरूनही कडक उन्हामुळे सायंकाळी जमीन कोरडी दिसून येत आहे. तेव्हा पिके कशी जतन करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.