शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वीज केंद्रांवर लवकरच ‘सिटीझन चार्टर’

By admin | Updated: January 23, 2015 23:14 IST

मुख्य अभियंता अजनाळकर यांचे आश्वासन

नाशिक : जिल्ह्यातील सर्व वीज वितरण कंपनीची कार्यालये व सेवा केंद्रांमध्ये लवकरच ‘लोकपाल’ कायद्यानुसार वीज नियामक आयोगाने पारीत केलेले ‘सिटीझन चार्टर’चे फलक लावले जातील, असे आश्वासन वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता के. व्ही़ अजनाळकर यांनी वीज नियामक आयोगाच्या प्रतिनिधींना दिले आहेत़वीजग्राहकांच्या विविध प्रश्नांसंबंधी १६ जानेवारीला मुख्य अभियंता व जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंत्यांसोबत वीज नियामक आयोगाच्या सदस्यांनी चर्चा केली़ विधी सल्लागार सिद्धार्थ वर्मा यांनी लोकपाल कायद्यानुसार सिटीझन चार्टरचे अर्थात ‘सेवेचे निश्चितीकरण व भरपाईचे निश्चितीकरण’ या माहितीचे पाच बाय पाचचे फलक प्रत्येक कार्यालय, कक्ष कार्यालय, पैसे भरणा केंद्र, तक्रार केंद्रामध्ये ३१ जानेवारीपर्यंत लावण्याची मागणी केली़ यावर अजनाळकर यांनी लवकरच या माहितीचे फलक लावण्यात येतील, असे आश्वासन दिले़वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीजबिल थकबाकी असलेल्या ग्राहकांना कोणतीही लेखी नोटीस न देता वीजपुरवठा बंद करतात़ वास्तविक ग्राहकाचे आगाऊ डिपॉझिट जमा असूनही त्यापेक्षा कमी थकबाकीकरिता वीजग्राहकांचे कनेक्शन बंद करणे बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यानंतर यापुढे ग्राहकांना वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी लेखी नोटीस देण्याचे आश्वासनही अजनाळकर यांनी दिले़यावेळी वीज नियामक आयोगाच्या प्रतिनिधी विलास देवळे, अ‍ॅड़ व्यवहारे, बबन चौरे यांनी ग्राहकहिताच्या दृष्टीने विविध मागण्या तसेच ग्राहक सेवा सुधारणांची बैठक घेण्याची मागणी केली असता दर तीन महिन्यांनी ही बैठक घेतली जाईल, असे अजनाळकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)