शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पोलीस दलाचे संचलन

By admin | Updated: October 13, 2016 01:26 IST

नाशिकरोड : तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी; पवन पवारसह चौघांवर गुन्हा

नाशिकरोड : परिसरात गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सशस्त्र संचलन सुरू केले आहे. जमावबंदी आदेश असतानाही नगरसेवक पवन पवार व त्याचे साथीदारांनी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जेलरोड येथे दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. घटनेनंतर जेलरोड परिसरातील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली. त्यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी सकाळी शहरातून पोलिसांचा मोठा फौजफाटा संचलन करीत उपनगर चौफुलीवर दुपारी एक वाजेच्या सुमारास आला. पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, सचिन गोरे, मोहन ठाकुर, बजबळे, शालीग्राम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, संजय देशमुख, नारायण न्याहळदे, देवराज बोरस्ते, हनुमंत गाडे आदिंसह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, राइट कन्ट्रोल फोर्स, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, कमांडो पथक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस असा मोठा फौजफाटा कॅनॉलरोडने वाहनांमधून संचलन करत जेलरोड देशमुख भवन पर्यंत आला. तेथून पोलिसांचे संचलन जेलरोड शिवाजी पुतळा, राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या दिशेने निघाले. पोलिसांची सतर्कताराजराजेश्वरीकडून पोलिसांचे संचलन मॉडेल कॉलनी रस्त्यावरून शिवाजीनगरमध्ये आले. यावेळी नगरसेवक पवन पवार यांच्या कार्यालयाशेजारी काही कार्यकर्ते बसलेले होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने निघून जाण्याबाबत सांगितले असता त्यावरून वाद निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांकडून प्रतिकार सुरू झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारमध्ये नगरसेवक पवन पवारसह त्याचा भाऊ विशाल व इतर साथीदारही सुटले नाही. लाठीमारमध्ये जखमी झालेल्या पवार बंधूंवर बिटको रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खाकीचा हिसका दाखविण्यास सुरुवात केल्याने काही मिनीटांतच जेलरोड परिसरातील दुकाने बंद होऊन अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शिवाजीनगर येथून पोलिसांचे संचलन जेलरोड, मध्यवर्ती कारागृहासमोरून भीमनगर, ब्रम्हगिरी सोसायटी, बेला डिसुझा रोडवरून के.एन. केला शाळा चौफुलीवर आले. यावेळी पोलिसांनी काही जणांना लाठ्यांचा प्रसाद देत पिटाळून लावले. यावेळी युवक व महिलांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करण्यास सुरूवात केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी जमावाची समजूत काढल्यानंतर जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी देवळालीगांव राजवाडा येथेही संचलन केले. राजवाड्यातून पोलिसांनी विहितगाव बागुलनगरपर्यंत संचलन केले. (प्रतिनिधी)