गुरुवारी सायंकाळी कृषी बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झालेल्या कोथिंबीर प्रति जुडीला १० ते १५ रुपये असा भाव मिळाला. शेतमालाला पोषक वातावरण असल्याने व पाणी भरपूर प्रमाणात शिल्लक असल्याने सध्या शेतमालाचे उत्पादन वाढीस लागले आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरातसह अन्य राज्यात कोथिंबीर रवाना केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेथील बाजार समितीत स्थानिक शेतमाल दाखल होत असल्याने परराज्यात बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे परराज्यात रवाना केल्या जाणाऱ्या कोथिंबीर मालाला गेल्या महिन्या दीड महिन्यापासून ब्रेक लागला असल्याचे व्यापारी श्याम बोडके यांनी सांगितले. कोथिंबीर पाठोपाठ मेथी भाजी आवक वाढलेली असल्याने मेथी जुडीचे दर घसरले आहे. बाजारात मेथी जुडीला कमीत कमी ८ ते १० रुपये बाजारभाव मिळत आहे.
आवक वाढल्याने कोथिंबीर दहा रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST