शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत पालेभाज्यांचे भाव कडाडले

By admin | Updated: June 3, 2017 00:36 IST

सिडको : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भाजीबाजारांची आवक घटल्यामुळे सिडको भागातील बाजारपेठांमध्ये काही ठिकाणी शुकशुकाट दिसून आला.

 लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भाजीबाजारांची आवक घटल्यामुळे सिडको भागातील काही बाजारपेठांमध्ये तुरळक तर काही ठिकाणी शुकशुकाट दिसून आला. विक्रेत्यांकडून आहे तो माल मात्र दुप्पट भावाने विक्री केला जात असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी बेमुदत संपावर गेल्याने सिडको भागातील पवननगर व शिवाजी चौक या ठिकाणी तुरळक, तर उपेंद्रनगर व त्रिमूर्ती चौकात मात्र शुकशुकाट दिसून आला. शेतकरी हे बेमुदत संपावर जाणार असल्याने संप सुरू होण्याच्या आधीच भाजीपाला विक्रेत्यांनी जादा माल भरून ठेवला होता. परंतु आज दुसऱ्या दिवशी विक्रेत्यांकडील माल हा कमी राहिल्याने त्यांनी आज दुप्पट भावाने भाजीपाला विक्री केला . सिडकोतील नेहमी गजबतलेला भाग व मुख्य बाजारपेठ असलेल्या पवननगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजी चौक व उपेंद्रनगर भागात या संपाचा परिणाम जाणवला. या भागात सकाळ व सायंकाळच्या सुमारास कायमच गर्दी असताना शुक्रवार मात्र शुकशुकाट जाणवत होता. एकूणच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपचा परिणाम हा सिडको भागातील बाजारपेठांमध्ये जाणवू लागला असून, अधिक भावाने भाजीपाला विकत घ्यावा लागत असल्याने ग्राहकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. संपच्या पहिल्या दिवशी पाथर्डीफाटा येथे सीटूच्या वतीने निदर्शने करीत संपाला पाठिंबा दर्शविला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मात्र सिडको व अंबड भागात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.