शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत वादळाने नुकसान

By admin | Updated: May 28, 2014 01:40 IST

पावसाच्या हलक्या सरी : विक्रेत्यांची उडाली धांदल

पावसाच्या हलक्या सरी : विक्रेत्यांची उडाली धांदलसिडको : पंचवटीसह शहरात काही ठिकाणी जोरदार वादळीवार्‍यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली असली, तरी सिडकोत मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गारांचा पाऊस झाला नसला, तरी वादळीवार्‍यामुळे अनेकांचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली, तर वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले. अचानक आलेल्या पावसाने विक्रेत्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली, तर बालगोपाळांनी पावसाच्या सरींचा आनंद लुटला. मंगळवारी दुपारी पावसाच्या सरी कोसळण्यापूर्वी सोसाट्याच्या वादळीवार्‍याने सिडकोवासीयांची धांडल उडविली. जोरदार वार्‍यामुळे धूलिकणांनी अवघे वातावरण आच्छादून टाकले होते. त्यामुळे डेक्कन पेट्रोलपंपासमोरील झाड उन्मळून पडले. यात कोणतेही नुकसान झाले नसले, तरी वाहतुकीची कोंडी मात्र झाली. त्यामुळे दत्ता जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी सदरील झाड बाजूला करीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. शिवाजी चौकातही झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजतारांवर पडल्याने तारा तुटल्या आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सिडकोतील अनेक चौकांमध्ये लावण्यात आलेले जाहिरातींचे व शुभेच्छांचे फलक वादळीवार्‍याने पडले. पवननगर, उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, स्टेट बॅँक, गणेश चौक, शिवाजी चौक, राणाप्रताप चौक आदि ठिकाणच्या फलकांचे वादळाने नुकसान होऊन लोंबकळत होते, तर काही तुटून पडले होते. झोपडप˜ीतील अनेक घरांचे पत्रे वादळाने उडून गेल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. अनेकांना पावसापासून सामान वाचविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. शिवाजी चौकातील भाजीमंडईतील विक्रेत्यांचीही पावसाने चांगलीच तारांबळ उडविली. सिडकोतील अनेक रस्त्यांवर वादळामुळे झाडांच्या पालापाचोळ्याचा ढीग साचला होता, तर जागोजागी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. गारांचा पाऊस नाहीनाशिकसह पंचवटी परिसरात गारांचा पाऊस झाला असला, तरी सिडकोत मात्र गारांचा पाऊस झाला नाही. सोसाट्याच्या वादळीवार्‍यासह रोहिणीच्या जलधारांनी मात्र हजेरी लावली आणि बालगोपाळांनी त्यात चिंब भिजण्याचा आनंदही लुटला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.