शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत धोकादायक वीजतारांचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:14 IST

येथील बहुतांशी नागरिकांच्या घरांवरच उच्चदाबाच्या वीजतारांचे जाळे पसरलेले असून, विजेचा धक्का लागून अनेकजण जखमी होण्याचे प्रकारही कायमचे झालेले असतानाही याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले असल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सिडको : येथील बहुतांशी नागरिकांच्या घरांवरच उच्चदाबाच्या वीजतारांचे जाळे पसरलेले असून, विजेचा धक्का लागून अनेकजण जखमी होण्याचे प्रकारही कायमचे झालेले असतानाही याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले असल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.  गेल्या आॅगस्ट महिन्यात घराच्या गच्चीवर केबलचे काम करीत असताना गच्चीजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वाहिनीचा धक्का लागून तिघे जण जखमी झाल्याची घटना सिडकोतील दत्तचौक भागात घडली होती. यावेळी याठिकाणी पाहणी करण्यासाठी राजकीय नेत्यांनी गर्दी केली होती. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनीदेखील पाहणी करून येथील वीजतारा त्वरित भूमिगत करण्यात येणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. परंतु प्रत्यक्षात अद्यापही कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिडको भागातील काही प्रभागांत नगरसेवकांनी पुढाकार घेऊन प्रभागातील वीजतारा भूमिगत केल्या असल्यातरी आजही संपूर्ण सिडकोचा विचार करता दत्तचौक, राणाप्रताप चौक, साईबाबनगर, मोरवाडी, तोरणानगर, राजरत्ननगर, त्रिमूर्ती चौक यांसह अजूनही इतर भागांत मोठ्या प्रमाणात वीजतारा भूमिगत झालेल्या नाहीत. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दरम्यान गच्चीवर पतंग उडविताना अनेकांना उच्चदाबाच्या वीजतारांचा धक्का लागल्याचे प्रकार घडले असून, यापुढील काळात तरी वीज वितरण कंपनीने धोकादायक वीजतारा भूमिगत करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.प्रश्न सुटणार कधी?दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवसात गच्चीवर पतंग उडवित असताना वीज तारांचा शॉक लागून अनेकजण जखमी झाले असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. यापुढील काळातरी अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी वीज वितरण कंपनी याबाबत गांभीर्य दाखविणार का? असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे. याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभा तसेच प्रभाग सभेत आवाज उठविला असला तरी अद्यापही सिडको भागातील वीजतारा भूमिगत करण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही.