शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

सिडकोत निवडणुकीचे वातावरण तापले

By admin | Updated: January 6, 2017 00:24 IST

हौशी इच्छुकांकडून पोस्टरबाजी; कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस

सिडको : येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीचे वातावरण सिडको भागात तापू लागले असून, मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत असून, आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर विद्यमान नगरसेवकांनी विकासकामांचे लोकार्पण केले, तर इतर इच्छुकांनी प्रभागात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.निवडणूक म्हटली की, इच्छुक उमेदवारांकडून कार्यकर्त्यांची जमवाजमव करत त्यांना खूष करण्यावर भर दिला जातो. सिडकोतही इच्छुकांकडून कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली असल्यामुळे कार्यकर्त्यांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळाले. येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी सिडको भागातील प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून पत्रके तसेच मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात येत आहे. बहुतांशी प्रभागातील इच्छुकांनी एक ते दोन वेळा पूर्ण प्रभागात फिरून मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. सिडको प्रभागात शिवसेना व भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. एका प्रभागात चारपेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असून, यात प्रभाग क्रमांक २९ मध्ये सेनेत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील भागात इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठी उमेदवारी देतील किंवा नाही याची परवा न करता पक्षाच्या माध्यमातून प्रभागात प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. यातच काहींनी तर चार उमेदवारांचे पॅनलदेखील स्वत: निश्चित करत मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली आहे. तर इच्छुक उमेदवारांकडून आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे मतदारांना सांगत प्रचार केला जात आहे. (वार्ताहर)