शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचा प्रभाग जोडला पश्चिम विभागाला

By admin | Updated: January 24, 2017 00:51 IST

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली सूत्रे हाती

सिडको : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज सिडको प्रभागासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली. सिडकोतील सहा प्रभागांपैकी प्रभाग २४ हा नाािशक पश्चिम विभागाला जोडला गेला असल्याने येथील इच्छुकांची चांगलीच धावपळ होणार आहे.  येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घेतलेल्या मनपा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, येत्या २७ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सिडको प्रभागात प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८, २९ असे सहा प्रभागांचा समावेश आहे. परंतु मनपाने यातील प्रभाग क्रमांक २४ हा सिडको प्रभागातून वगळून तो मनपाचा पंडितनगर येथील नाशिक पश्चिम विभागात समाविष्ट केला आहे. यामुळे सिडकोतील प्रभाग २४ मधील इच्छुक असलेल्या सर्वांसाठी हे त्रासदायक ठरणार असल्याचे दिसत आहे. तसेच २४ प्रभाग वगळून यात इंदिरानगर भागातील प्रभाग ३१चा सिडको प्रभागात समावेश केला आहे.  सिडकोतील प्रभाग क्र मांक २५, २६ व २८ साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनपाच्या धुळे विभागाचे उपायुक्त रवींद्र जाधव, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरचे राहुल जाधव तसेच मनपा सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी सूत्रे हाती घेतली आहे, तर प्रभाग क्रमांक २७, २९ व ३१ या प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हा उपनिबंधक एन. डी. करे यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळ्याचे तहसीलदार अनिल गावित, मनपा उपायुक्त संजीव बच्छाव, बी. वाय. मालावाल यांनी सूत्रे हाती घेतील आहे. (वार्ताहर)