नाशिक : शहरासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सिडकोतील सराईत गुन्हेगार नीलेश विनायक कोळेकर (२५ रा. शनैश्चर मंदिर, सावतानगर) यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१२) सायंकाळी सिडकोतील सावतानगरमधून अटक केली़शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या नीलेश कोळेकर याला २२ सप्टेंबर २०१४ पासून शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)
सिडकोतील तडीपार गुंडास अटक
By admin | Updated: August 14, 2016 02:07 IST