नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सिडकोतील आनंदनगरमध्ये घडली आहे़ मंगेश विभुते (रा़भक्ती रो-हाऊस) हे शुक्र वारी (दि.१६) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ याप्रकरणी विभुते यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
By admin | Updated: October 18, 2015 23:20 IST