शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सादरे आत्महत्त्येचा तपास सीआयडीकडे

By admin | Updated: October 29, 2015 22:28 IST

कागदपत्रांचा अभाव : आज सुनावणी

नाशिक : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणात थेट पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्याचा योग्य तपास होण्याविषयी सादरे कुटुंबीयांकडून व्यक्त होणारा संशय पाहता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या साऱ्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे सोपविला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित सागर चौधरी याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, दि. ३० रोजी सुनावणी होणार असून, त्यानंतरच गुन्ह्याची कागदपत्रे सीआयडीकडे सोपविण्यात येणार आहेत. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रायते व वाळू ठेकेदार सागर चौधरी या तिघांविरुद्ध येथील पंचवटी पोलीस ठाण्यात सादरे यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. (पान ९ वर)या गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा संबंध असल्यामुळे पोलीस प्रकरण दडपण्याची तक्रार सादरे यांच्या पत्नीने जाहीरपणे केली होती. त्याची दखल घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय घेऊन तसे आदेश काढले आहेत. स्थानिक पातळीवर गुरुवारी सकाळी आदेश मिळताच, सदर गुन्ह्याच्या कागदपत्रासाठी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना पत्र देऊन मागणी केली, परंतु या गुन्ह्यातील अन्य संशयित सागर चौधरी याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने गुन्ह्याचे कागदपत्रे न्यायालयाने ठेवून घेतले आहेत. शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे उप अधीक्षक के. डी. पाटील करणार आहेत. एका स्तरावरील चौकशी पूर्णअशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपासाबाबत दोन स्तरावर चौकशी सुरू होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंग यांच्याकडे विभागीय चौकशी होती; ती आता पूर्ण झाली असून त्याचा अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला आहे. तर नाशिकचे आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यामार्फत दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक