शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थेट सरपंच निवडीने चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:33 IST

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द व जयपूरच्या थेट सरपंचाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यात थेट १४ सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले असून, १४ गावातील ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

कळवण : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द व जयपूरच्या थेट सरपंचाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यात थेट १४ सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले असून, १४ गावातील ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाºया तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबरला तालुक्यात मतदान होणार आहे. स्थानिक पुढाºयांसह त्यांना मानणाºया नेत्यांचीही प्रतिष्ठा यातून पणाला लागणार आहे. यंदा पहिल्यांदाच गावचा सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे. लोकनियुक्त १४ गावांतील सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले आहे. ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवारकळवण खुर्द ३ प्रभागातील ९ जागा (बिनविरोध), जयपूर ३ जागांसाठी ७ जागा ( बिनविरोध) कोसुर्डे ३ प्रभागातील ९ जागांसाठी १६ उमेदवार, पिळकोस ३ प्रभागातील ९ जागांसाठी २२ उमेदवार, देसराणे ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १७ उमेदवार, मानूर ५ प्रभागांतील १३ जागांसाठी २९ उमेदवार, भादवण ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २३ उमेदवार, पाळे खुर्द ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २५ उमेदवार, वाडी बुद्रुक ४ प्रभागांतील ११ जागांसाठी २७ उमेदवार, बगडू ३ प्रभागांतील ७ जागांसाठी १३ उमेदवार, गोळाखाल ४ प्रभागांतील ११ जागांसाठी १९ उमेदवार, कुंडाणे (ओ) ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार, जयदर ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार, निवाणे ५ प्रभागांतील १३ जागांसाठी २५ उमेदवार, शिरसमणी ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २५ उमेदवार, तर सुळे ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, निवडणुकीचे खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.कळवण खुर्द, जयपूर बिनविरोधकळवण खुर्द व जयपूर ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध होऊन कळवण खुर्द सरपंचपदी रत्ना पवार तर जयपूर सरपंचपदी मीनाक्षी गायकवाड यांची निवड झाली.  कळवण खुर्द ग्रामपंचायतमध्ये लीलाबाई भाऊसाहेब शिंदे, किशोर  वनजी गवळी, मंगला रमेश पवार, राहुल आनंदा गांगुर्डे, हितेंद्र शरद पगार, सविता भगवान शिंदे, मंगला महेश पवार व राजेंद्र कौतिक गवळी हे बिनविरोध निवडून आले असून, प्रभाग क्र मांक ३ मधील अनुसूचित  जमाती स्त्री राखीव उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने जागा रिक्त राहणार आहे. तर जयपूर ग्रामपंचायतमध्ये सुनील पोपटराव गायकवाड, सुनीता पोपट बागूल, अनिल सोमनाथ पवार, ललीता देवचंद बागुल, बळीराम तुळशीराम खैर, ज्योती सुभाष चौधरी, इंदूबाई धनराज पाडवी यांची बिनविरोध निवड झाली.१६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाचे आरक्षणकळवण खुर्द ( अनुसूचित जमाती स्त्री) रत्ना लक्ष्मण पवार (बिनविरोध), जयपूर (अनुसूचित जमाती स्त्री) मीनाक्षी सुनील गायकवाड (बिनविरोध), कोसुर्डे (अनुसूचित जमाती), पिळकोस (अनुसूचित जमाती), देसराणे (अनुसूचित जमाती स्त्री), मानूर (अनुसूचित जमाती), भादवण (अनुसूचित जमाती, पाळे खुर्द (अनुसूचित जमाती), वाडी बुद्रुक (अनुसूचित जमाती), बगडू (अनुसूचित जमाती स्त्री), गोळाखाल (अनुसूचित जमाती स्त्री), कुंडाणे (ओ) अनुसूचित जमाती, जयदर (अनुसूचित जमाती स्त्री), निवाणे (अनुसूचित जमाती), शिरसमणी (अनुसूचित जमाती स्त्री), सुळे (अनुसूचित जमाती).