शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कासाठी शाळेकडून चक्क नगरसेवकाच्याच मुलीला गुणकपातीची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

सिडको : कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, राज्य शासनाने विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सिडको : कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, राज्य शासनाने विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळांनी आता शुल्क वसुलीसाठी मनमानी करीत विद्यार्थ्यांकडे शुल्कवसुलीसाठी तगादा लावला आहे. सिडकोतील सिंहस्थनगर येथील सेंट लॉरेन्स शाळेने तर चक्क एका नगरसेवकाच्याच मुलीला शुल्क न भरल्यास गुण कमी करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून, या शाळेविरोधात नाशिक पेरेंट्स असोसिएशन व संबंधित नगरसेवकाने शिक्षणाधिकार्‍यांकडे निवेदन देत शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नगरसेवक सुदाम डेमसे यांची मुलगी सिडकोतील सेंट लॉरेन्स शाळेत दहावीत शिक्षण घेत आहे. मात्र राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने उत्तीर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. याच गोष्टीवर बोट ठेवत या शाळेने सुदाम डेमसे यांच्या पत्नींना फोन केला. हा फोन त्यांच्या मुलीने उचलला, यावेळी शाळेकडून मुलीला दहावीचे शुल्क भरले नाही तर कमी मार्क देऊ, मार्क्स देण्याचा अधिकार शाळेला असल्याचे सांगत शुल्क वसुलीसाठी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती संबंधित मुलीने सुदाम डेमसे यांना दिल्यानंतर त्यांनी पॅरेंट्स असोसिएशनची मदत घेत शाळेला जाब विचारला. परंतु, शाळेने संबंधित शिक्षकाची बाजू घेतल्याचे नमूद करीत डेमसे व पॅरेंट्स टीचर असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना तक्रारीचे निवेदनही देण्यात आले आहे.

कोट-

राज्य शासनाने परीक्षा रद्द केल्याने सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करण्याचा विषय येत नाही. आमची खासगी संस्था असल्याने कामकाज करणारे शिक्षक, कर्मचारी या सर्वांचा पगार देणे कठीण जाते. परंतु अशा परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थ्यांला दमबाजी केली जात नाही. परंतु शासनाचे नियम पाळत विद्यार्थ्यांकडे बाकी असलेले शुल्क दमबाजी न करता मागणी करीत आहे. याबाबत पालकांनी गैरसमज करून घेऊ नये.

- माधुरी कसबे, मुख्याध्यापक, सेंट लॉरेन्स हायस्कूल, सिडको

शाळांच्या मनमानीकडे शिक्षण विभागाचा काणाडोळा

कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंब अडचणीत असताना शहरातील खासगी शाळांकडून शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांची कोंडी केली जात असून, ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत. सेंट लॉरेन्स शाळेकडून तर थेट नगरसेवकाच्याच मुलीला धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. नगरसेवकाच्याच मुलांसदर्भात असा प्रकार घडत असले तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. शुल्क वसुलीसाठी शाळांकडून अशा प्रकारे अडवणूक होत असताना शिक्षण विभागाकडून मात्र शाळांच्या मनमानीकडे काणाडोळा होत असल्याचा आरोपही पालकांकडून केला जात आहे.