शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चौक सुशोभिकरणाला बसला मंदीचा फटका

By admin | Updated: November 6, 2014 00:23 IST

प्रायोजकांची माघार : प्रत्यक्ष कामे करण्यास टाळाटाळ

नाशिक : शहरातील चौक सुशोभिकरणासाठी व्यावसायिकांनी विशेषत: बांधकाम व्यावसायिकांनी दाखवलेला उत्साह आता आटला आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सध्या बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याचे निमित्त करून तसे पत्र पालिकेला दिले आहे, तर काही व्यावसायिकांनी पालिकेचे दूरध्वनी घेणेही टाळण्यास प्रारंभ केला आहे.शहर सुशोभिकरणात व्यावसायिकांचा सहभाग असावा यासाठी महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला के्रडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने प्रतिसाद दिला आणि तब्बल पस्तीस ते चाळीस चौक सुशोभिकरण करण्याचे ठरविण्यात आले. पालिकेकडे तसा प्रस्ताव देऊन कोणते चौक कोण विकसित करणार याची यादीही तयार करण्यात आली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक तसेच अन्य काही प्रायोजकांना अडचणी येत असल्याने तत्कालीन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्याकडे बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या आधीच २२ वाहतूक बेटांसाठी भूमिपूजन करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने पाठपुरावा केला; मात्र फारसे यश आले नाही. महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर चाळीसपैकी १७ वाहतूक बेट सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार करारही करण्यात आले; परंतु अनेकांनी हात आखडता घेतला आहे. वीस-चाळीस लाख रुपये खर्च करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून, बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने सध्या रेडीरेकनरचे दर वाढल्याने व बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याने तूर्तास चौक सुशोभिकरणाचा विषय बाजूला ठेवण्यास सांगितले. अन्य काही व्यावसायिकांनी अशाच प्रकारे तूर्तास शक्य नसल्याचे तोंडी सांगितले आहे. काही व्यावसायिक दूरध्वनी घेण्यासही तयार नसल्याने त्यांची भूमिकादेखील स्पष्ट होणे कठीण झाले आहे. काही मोजकीच प्रकरणे आयुक्तांच्या दरबारी करारासाठी प्रलंबित आहेत.सध्या खाबिया ग्रुप, संदीप फाउंडेशन, किरण चव्हाण यांच्यासारखे काही मोजकेच व्यावसायिक लक्ष पुरवून चौक सुशोभित करीत आहेत. अन्य व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याने लवकरच याबाबत तड लागावी अन्यथा नवीन प्रायोजक शोधण्याच्या तयारीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)