शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विकृत चाळे करणाºयास महिलांकडून चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:55 IST

इंदिरानगर परिसरात यापूर्वी दुचाकीवरून येत एका तरुणाने महिला-मुलींची छेडछाड करत विकृत चाळे करण्याचा ‘उद्योग’ सुरू केला होता. यानंतर काही दिवसांपासून येथील राजसारथी सोसायटी, आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक इसम चारचाकीमधून येऊन महिला-मुलींची छेड काढत विकृत चाळे करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर महिलांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

इंदिरानगर : इंदिरानगर परिसरात यापूर्वी दुचाकीवरून येत एका तरुणाने महिला-मुलींची छेडछाड करत विकृत चाळे करण्याचा ‘उद्योग’ सुरू केला होता. यानंतर काही दिवसांपासून येथील राजसारथी सोसायटी, आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक इसम चारचाकीमधून येऊन महिला-मुलींची छेड काढत विकृत चाळे करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर महिलांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक विकृत प्रवृत्तीचा इसम रात्री-मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार (एमएच १६ एबी ०४१३) मधून येऊन खाली उतरत परिसरातील महिला-मुलींची छेड काढून अश्लील चाळे करत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर बाब दक्ष नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र पोलिसांना तो मिळून आला नाही. अखेर महिलांनी त्याच्यावर पाळत ठेवून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रचला. दरम्यान, विकृत इसम राजेंद्रकुमार तिवारी (३२) हा परिसरात नेहमीप्रमाणे आला आणि वाहनातून उतरून चाळे करू लागला. अश्लील नजरेने महिला-मुलींकडे बघून हावभाव करत असल्याचे लक्षात आल्यानंतर एका महिलेने त्याला हटकले. यावेळी तिवारी याने तिचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र सदर बाब परिसरातील अन्य महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला धरून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार पायातल्या जोड्यांनी चोपून काढले. गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर, राणेनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ झाल्याने नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे.