संगमेश्वर : फटाके फोडल्यानंतर निघालेल्या धुरामुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास झाल्याने नेत्रतज्ज्ञांकडे धाव घ्यावी लागली.दीपावलीच्या सणात आकाशकंदील, फराळ, नवे कपडे याबरोबरच फटाक्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. शोभेचे फटाके व मोठा आवाज करणारे बॉम्ब लक्ष्मीपूजनापासून मोठ्या प्रमाणावर मालेगावी शहरात फोडले जातात. आबालवृद्ध यात उत्साहाने सहभागी होतात. विशेषत: लहान मुलांचा तर शोभेचे फटाके फोडण्यावर भर असतो. फुलबाजे, भूईचक्कर, भूईनळे यासारखे प्रकाश देणारे शोभेचे फटाके फोडून दीपावलीचा सण साजरा केला जातो; मात्र, हे फटाके फोडल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे अनेकांच्या डोळ्यास त्रास जाणवू लागला. डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येणे असा त्रास अनेकांना झाला. विशेषत: लहान मुलांन याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याच्या घटना शहरात घडल्या. त्रास झालेल्यांना शहरातील नेत्रतज्ञांकडे धाव घ्यावी लागली. डॉक्टरांनी यावर उपचार केल्याने डोळ्यांना आराम पडल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
फटाक्याच्या धुरामुळे मुलांच्या डोळ्यांना इजा
By admin | Updated: October 26, 2014 22:43 IST