शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

प्रसादात मोदकासह चॉकलेट, ड्रायफ्रुट्सची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:13 IST

नाशिक : लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांची क्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोड मिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळांचे पदार्थही गौरी पूजनासाठी उपलब्ध झाले आहे.

ठळक मुद्देगोडधोड पदार्थांची मेजवाणी : रवा, बुंदी आणि बेसन लाडूलाही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांची क्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोड मिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळांचे पदार्थही गौरी पूजनासाठी उपलब्ध झाले आहे.कोरोना आणि टाळेबंदी अशा दुहेरी संकटचे करू अनुभव बाजूला ठेऊन भाविकांनी घरोघरी विघ्नहर गणरायांचे जल्लोषात स्वागत करून बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवला. यंदा घरगुती गणपती उत्सव दहा दिवस असल्याने गोडधोड पदार्थांची मेजवाणी असणार आहे. लाडक्या गणेश बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवला जातो.गूळ खोबऱ्याच्या मोदकाबरोबर मिठाईच्या दुकानात खवा, मलई मोदकाला मोठी मागणी आहे. खव्याच्या मोदकामध्ये पिस्ता, आॅरेंज हे दोन कलर असून मलई मोदकामध्ये आँरेज, स्ट्रॉबेरी, अंजीर, चॉकलेट मोदक ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. छोट्या आकाराचे २१ चॉकलेटी मोदकांचा बॉक्स उपलब्ध आहे.काही बेकरीमध्ये मोदकाच्या आकाराचा शाकाहारी केकही आॅर्डरप्रमाणे उपलब्ध करुन दिले जात आहेत. गणपतीबरोबर गौरीचा सणही मोठ्या प्रमाणावर घरोघरी साजरा केला जातो.गौरीची बडदास्त करताना तिच्यासमोर गोड मिठाईबरोबर फराळाचे तिखट पदार्थांची मांडणी केली जाते.चकली, चिवडा, शंकरपाळी, पापडी, बाकरवडीला मोठी मागणी आहे. गणेश आगमनानंतर गौरी आगमनापूर्वी फराळांच्या पदार्थांना मागणी वाढते असे व्यावसायिकांनी सांगितले. विविध प्रकारचे फरसाण, चिवडा, चकली, शंकरपाळी, शेव अशा फराळाच्या विविध पदार्थांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. फराळ घरी करण्यापेक्षा तयार आणण्याकडे महिला वर्गाचा कल अधिक दिसून येत आहे.यामुळे बाप्पाच्या आरतीनंतर मिळणाºया प्रसादात नवनवीन पदार्थांची चव भाविकांना चाखायला मिळत आहे.बालुशाही, म्हैसूरपाक, बुंदीला मोठी मागणीमोदकात मॅगोचे सारण असल्याने आंबड गोड चवीमुळे चॉकलेट मोदकाला पसंती मिळत आहेत. मोदकाबरोबर खाजा, बालुशाही, म्हैसूरपाक, बुंदीला मोठी मागणी आहे. बुंदीच्या मोठ्या आकाराच्या मोदकाला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. रवा, बुंदी आणि बेसन लाडूलाही मागणी आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी