सिन्नर : ‘स्वच्छता आपण राखूया, कोरोनाला हरवूया’ हे घोषवाक्य घेऊन कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी व जनसामान्यांच्या मार्गदर्शनासाठी सज्ज झालेल्या चित्ररथाचे सिन्नर पंचायत समिती आवारात अनावरण करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग यांच्या साह्याने सेव्ह द चिल्ड्रन आणि सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अॅण्ड अॅक्टिव्हिटिज या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकडे यांच्या हस्ते चित्ररथाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे, लता गायकवाड, डॉ. मोहन बच्छाव, पशुधन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे उपस्थित होते.कृषी विस्तार अधिकारी के. एल. भदाणे, रवि पवार, सेव्ह द चिल्ड्रनचे प्रकल्प समन्वयक धनंजय दिघे, सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटिजचे योगेश पाटील, भाऊसाहेब शेळके, विकास मस्के आदी उपस्थित होते.सिन्नर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या प्रयत्नातून हा चित्ररथ तालुक्यातील २० गावांत प्रबोधन करणार आहे. कोरोनाविरुद्ध लढण्याचे कार्य, प्रात्यक्षिक, संदेश व दक्षता पूर्ण बाबीतून समाजाला, गावांना समजवण्याचे कार्य या चित्ररथाच्या माध्यमातून केले जाणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी चित्ररथाला शुभेच्छा दिल्या. अशोक सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
कोरोना जनजागृतीसाठी चित्ररथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:14 IST
‘स्वच्छता आपण राखूया, कोरोनाला हरवूया’ हे घोषवाक्य घेऊन कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी व जनसामान्यांच्या मार्गदर्शनासाठी सज्ज झालेल्या चित्ररथाचे सिन्नर पंचायत समिती आवारात अनावरण करण्यात आले.
कोरोना जनजागृतीसाठी चित्ररथ
ठळक मुद्देसिन्नर : ‘स्वच्छता आपण राखूया, कोरोनाला हरवूया’