शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिट फंड घोटाळा : गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कामगिरी सव्वादोन कोटींची फसवणूक करणाऱ्यांच्या बांधल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:23 IST

नाशिक : गुंतवणुकीवर दामदुप्पट आमिषापोटी बहुतांश गुंतवणूकदारांची अहमदनगर जिल्ह्यात फसवणूक करणाºया तिघा भामट्यांना नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली.

ठळक मुद्देजादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूकशंभरहून अधिक गुंतवणूकदारांची हजारो ते लाखो रुपयांची फसवणूक

नाशिक : गुंतवणुकीवर दामदुप्पट आमिषापोटी बहुतांश गुंतवणूकदारांची अहमदनगर जिल्ह्यात फसवणूक करणाºया तिघा भामट्यांना नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली. त्यांच्याविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याने तिघांना नगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी अहमदनगर, पुणे जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाºया कोपरगावच्या तिघे संशयित नाशिकमध्ये वावरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेला संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक विजय लोंढे, श्रीराम सपकाळ, राजाराम वाघ, योगेश सानप आदींच्या पथकाने शहरातील संशयित ठिकाणी भामट्यांचा माग काढला. दरम्यान, मुंबईनाका व पाथर्डीफाटा येथून पथकाने संशयित प्रवीण वरगुडे, दिगंबर बैरागी, राजू जेजूरकर यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. वरगुडे याने कबुली देत कोपरगाव येथे व्हिनस नावाची कंपनीकरिता फिर्यादी विठ्ठलराव धुमाळ (रा.चिंचोली, शिरुर) यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. या तिघांविरुद्धवरील तिघा संशयितांविरुद्ध धुमाळ यांनी फिर्याद दिल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या तिघांनी पुणे जिल्ह्णातील शिरूर व अहमदनगर जिल्ह्णातील राहता तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक गुंतवणूकदारांची हजारो ते लाखो रुपयांची फसवणूक केली. एकूण सव्वादोन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती तपासात पुढे आली.नाशिक टार्गेट?गुंतवणूक रकमेवरील जादा व्याजाचे धनादेश तात्पुरत्या स्वरूपात गुंतवणूकदारांना भामटे देत होते. धनादेश दिल्यानंतर व्याजाचे आमिष दाखवत वाढीव धनादेश देतो, असे सांगून अगोदर दिलेले धनादेश ताब्यात घेत तिघांकडून गुंतवणूकदारांना भूलथापा दिल्या जात होत्या, असे तपास पथकाचे देवडे यांनी सांगितले. दरम्यान, या तिघांचा नाशिकमध्ये कधीपासून वावर होता व ते कोणाच्या संपकर् ात आले होते आणि त्यांच्याकडून पुणे, अहमदनगरनंतर नाशिक ‘टार्गेट’ केले जाणार होते का? अशा सर्व बाबींचा अंदाज बांधत गुन्हे शाखा तपास करत आहे.