शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मोलमजुरी करणाऱ्यांना चिंचोक्यांनी दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:16 IST

सिन्नर : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने उपाययोजना म्हणून देशभरात ‘लॉकडाउन’ पाळले जात आहे. या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात ...

सिन्नर : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने उपाययोजना म्हणून देशभरात ‘लॉकडाउन’ पाळले जात आहे. या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची कामे व अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट भरणाºयांची सद्यस्थितीत उपासमार सुरू झाली आहे. ‘कोरोना’सारख्या संकटाचा सामना करता करता पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागात मोलमजुरी करणाºयांना मात्र, चिंचोक्यांनी दिलासा दिला आहे.‘ना ध्यानी, ना मनी’ असे कोरोनाचे संकट आज देशातील जनतेवर आले आहे. त्याचा फटका अगदी खेड्या-पाड्यातील नागरिकांंनाही बसू लागला आहे. ग्रामीण भागातील मजुरांना आजही कोरोना म्हणजे काय हे माहीत नाही. हे कोरोना संकट निवारण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण कामगार व मजुरांना गावाकडची वाट धरावी लागली. तब्बल २१ दिवसांच्या बंदमुळे हातावर पोट भरणाºयांची मात्र, आता उपासमार सुरू झाली आहे. डुबेरे परिसरात विडी मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, लॉकडाउनमध्ये विडी उद्योगही कोलमडून पडला आहे.विड्या बांधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºयांचा हात बंद झाला आहे. परिसरात असलेल्या चिंचेच्या व्यापारामुळे चिंच फोडण्याचे काम विडी मजुरांना उपलब्ध झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात उपासमार होण्याचे संकट टळले आहे. विड्या बांधून मुला-बाळांच्या शैक्षणिक खर्चासह कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मात्र, आता ‘कोरोना’च्या संकटामुळे कामच बंद झाले आहे. त्यामुळे चिंचा उपजीविकेचे साधन बनले आहे. त्या फोडून मिळणाºया पैशातून उपजीविका केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय