शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंतला चिमुरड्याची हत्या

By admin | Updated: June 27, 2017 01:17 IST

पिंपळगाव बसवंत : पाच वर्षांच्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याला घरी नेऊन लैंगिक शोषण करून जिवे ठार मारल्याची घटना येथील इस्लामपुरा परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : पाच वर्षांच्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याला घरी नेऊन लैंगिक शोषण करून जिवे ठार मारल्याची घटना येथील इस्लामपुरा परिसरात घडली. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या अमानुष प्रकारामुळे इस्लामपुरा भागात सोमवारी ईद साजरी झाली नाही. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार संशयिताना अटक करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपुरा परिसरात लुकमान गनी पिंजारी हे आपले पत्नी, तीन मुली व मुलासह राहतात. रविवारी (दि. २५) रात्री ८ वाजेच्या सुमारास पिंजारी यांचा मुलगा साहिल ऊर्फ दादू लुकमान पिंजारी (५) हा अचानक गायब झाला.  परिसरात शोध घेऊनही साहिल न सापडल्याने याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांना माहिती देण्यात आली. साहिलचा शोध घेण्यासाठी शंभर ते दीडशे जणांनी इस्लामपुऱ्यातील सुमारे साडेतीनशे घरांची तपासणी केली. मात्र साहिल सापडला नाही.  लुकमान पिंजारी यांच्या घराजवळच भिकन निजर पिंजारी हा त्यांचा जवळचा नातेवाईक राहतो रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच्या घराला बाहेरून कुलुप लावून अमिना नजीर पिंजारी ही महिला घराबाहेर बसलेली आढळून आली. काही नागरीक या घराची झडती घेण्यासाठी गेले अमिना पिंजारी हिने त्यांना अटकाव केला मात्र नागरिकांनी विरोध झुगारून घर ऊघडले. घरात पलंगावर गादी गोळा केलेली दिसली मात्र गादीच्या बाहेर लहान मुलाचे पाय दिसले. नागरीकांनी गादी उलगडून पाहिली असता त्यात साहिलचा मृतदेह सापडला. रात्री साडेअकरा वाजता त्यास सरकारी दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरानी त्यास मृत घोषित केले . रात्री दीड वाजता येथील नागरिकांनी संशयित भिकन पिंजारी याला शोधले. त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री आठ वाजता साहिल यास चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेले व कोंडून ठेवले. लैंगिक शोषण करण्याच्या हेतूने त्याचे तोंड दाबून जिवे ठार मारल्याची कबुली संशयित भिकन निजर पिंजारी याने पोलीसांना दिली. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भिकन निजर पिंजारी, आमिनाबी निजर पिंजारी, शकीला इब्राहिम पिंजारी, नसरीन सादिक पिंजारी यांना अटक केली आहे. चौकट लुकमान गनी पिंजारी यांच्या कुटुंबात तीन मुलींच्या जन्मानंतर साहिलचा जन्म झाला. नवसाने झालेल्या साहिलसाठी लुकमान पिंजारी हे गेली पाच वर्षे भीक मागून कपडे अन्य साहित्य घेत होते. सोमवारी असलेल्या रमजान इदसाठी साहिलला वडिलांनी प्रथमच नवीन कपडे घेतले होते. व बुट घेण्यासाठी दुकानात गेले असताना साहिल यास संशयित भिकन घरी घेऊन गेला. या पूर्वीही भिकन याने हुजेब रज्जाक पिंजारी, लौकिफ जावेद पिंजारी या दोन बालकांना अमिष दाखवून घरी नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी झाला होता .  सदरच्या प्रकाराने इस्लामपूरा भागात ईद साजरी झाली नाही. अत्यतं शोकाकुल वातावरणात साहिल याचा दफनविधी करण्यात आला. ज्या घरात सदरची घटना घडली त्या घरात भानामती चालत असल्याची चर्चा रहिवाशांमध्ये असून हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रथमच घेतले होते नवीन कपडेलुकमान पिंजारी यांच्या कुटुंबात तीन मुलींच्या जन्मानंतर साहिलचा जन्म झाला. नवसाने झालेल्या साहिलसाठी पिंजारी हे गेली पाच वर्षे भीक मागून कपडे, अन्य साहित्य घेत होते. सोमवारी असलेल्या ईदसाठी साहिलला वडिलांनी प्रथमच नवीन कपडे घेतले होते व बुट घेण्यासाठी दुकानात गेले असताना साहिल यास संशयित भिकन घरी घेऊन गेला. यापूर्वीही भिकन याने हुजेब रज्जाक पिंजारी, लौकिफ जावेद पिंजारी या दोन बालकांना आमिष दाखवून घरी नेण्याचा प्रयत्न केला होता.सदर प्रकाराने इस्लामपुरा भागात ईद साजरी झाली नाही. अत्यंत शोकाकुल वातावरणात साहिल याचा दफनविधी करण्यात आला. ज्या घरात सदरची घटना घडली त्या घरात भानामती चालत असल्याची चचा रहिवाशांमध्ये असून, हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.