शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ढोबळी मिरची ठरत आहे फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:47 IST

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून ढोबळी मिरची लागवडीस प्राधान्य देतात. विशेषत: दारणा नदीच्या काठावरील चाडेगावच्या शिवारात ढोबळी मिरची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आढळते. शेडनेटमधील ढोबळी मिरचीला प्राधान्य देण्यात येते. साधारण ५० टक्के सूर्यप्रकाश अडविणारे पक्के शेडनेट यासाठी तयार केले जाते.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून ढोबळी मिरची लागवडीस प्राधान्य देतात. विशेषत: दारणा नदीच्या काठावरील चाडेगावच्या शिवारात ढोबळी मिरची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आढळते. शेडनेटमधील ढोबळी मिरचीला प्राधान्य देण्यात येते. साधारण ५० टक्के सूर्यप्रकाश अडविणारे पक्के शेडनेट यासाठी तयार केले जाते.ढोबळी मिरची लागवडीपूर्वी रोपे तयार केली जातात. ३ मीटर बाय १ मीटर बाय १५ सेंटीमीटर आकाराचे गादी वाफे तयार करून त्यावर उत्तम कुजलेले शेणखत अथवा गांडूळखत योग्यप्रकारे पसरविले जाते. एप्रिलपासून जुलै, आॅगस्टपर्यंत लागवड केली जाते. साधारणपणे ४५ ते ५५ दिवसांची व किमान चार ते सहा पाने असलेली रोपे पुनर्लागवडीसाठी वापरली जातात. लागवडीसाठी अडीच फूट उंचीचे व पाच फूट अंतर असलेले वाफे योग्यप्रकारे माती व खतांचे मिश्रण तयार करतात. दोन फूट उंचीच्या वाफ्यावर मल्ंिचग पेपर, त्याखाली इनलाइन ठिबकच्या दोन नळ्या जोडतात.----------------शेडनेटमधील लागवडीसासाठी खर्च जास्त येत असला तरी उत्पादनही चांगले निघते. लागवडीनंतर शेंडा मारणे, बांधणी करणे, औषधांचे फवारे मारणे यांसह खतांची मात्रा वेळच्या वेळी दिली, तर ४५ ते ६० दिवसांत उत्पादन काढण्यास सुरु वात होते. एकदा लागवड केली की सुमारे सहा महिन्यांपासून वर्षभरापर्यंत उत्पादन सुरू राहते. नाशिक बाजार समितीत विक्र ी केली जाते. एका क्रे टला साधारण ७०० ते ८०० रु पये भाव मिळतो. त्यामुळे खर्च वजा जाता बऱ्यापैकी पैसा शेतकऱ्यांच्या इतर शेतीकामांसाठी उपयोगी पडतो.-विलास चकोर, शेतकरी, चाडेगाव

टॅग्स :Nashikनाशिक