लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : एकलहरा रोड भागातील भालेराव मळ्यात घराजळ खेळणाऱ्या एका बालिकेच्या अंगावर सायकल पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोमल गोविंद निकम (४) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कोमल मंगळवारी (दि. १६) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत असताना ही घटना घडली. घराजवळच स्टँडवर उभी करून ठेवलेल्या सायकलला धक्का लागल्याने सायकल तिच्या अंगावर पडली. या घटनेत कोमल गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अंगावर सायकल पडून बालिकेचा मृत्यू
By admin | Updated: May 17, 2017 18:11 IST