शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुले असणाऱ्या मुलालाच दिली वडिलांनी मालमत्ता

By admin | Updated: April 18, 2016 00:10 IST

वाळविहीर : मुली आहेत म्हणून नाकारला इस्टेटीचा हक्क

घोटी : महिलांना समान हक्क मिळावेत यासाठी राज्यात महिला संघटना लढा देत असताना तसेच कायद्यानुसारही महिलांना सर्वत्र पन्नास टक्के आरक्षण मिळत असताना, आपल्या मुलाला फक्त मुली झाल्यात त्यामुळे त्याला आपल्या मालमत्तेचा वाटेकरी होण्याचा अधिकार नसल्याने बापाने चक्क या मुलाचा आपल्या मालमत्तेतील अधिकार नाकारला असल्याचा प्रकार इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर या आदिवासी गावात उघडकीस आला आहे. या पित्याने आपल्या दुसऱ्या मुलाला मुले आहेत म्हणून आपल्या मालमत्तेचे मृत्यूपूर्व वाटप केले आहे. दरम्यान, जन्मदात्या पित्याने आपल्याला मालमत्तेपासून वंचित ठेवल्याचे समजताच व्यथित झालेल्या या मुलाने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. मला फक्त मुलीच झाल्या यात माझा काय दोष, असा प्रश्न या मुलाने उपस्थित केला आहे.दरम्यान, वडिलांनी आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेचे मृत्यूपूर्व वाटप आपल्या भावाच्या नावाने केल्याची बाब येसू जोगनर यांच्या लक्षात आल्यावर त्यांना धक्काच बसला. याबाबत आपल्याला न्याय मिळावा यासाठी ते गेल्या महिनाभरापासून पोलीस ठाण्यासह महसूल कार्यालयाचे उंबरे झिजवित आहेत. दरम्यान, आपल्या वडिलांची आपल्या भावाने फसवणूक करून त्यांच्या वयाचा फायदा घेऊन हे एकतर्फी वाटपपत्र केले असल्याने हे वाटपपत्र रद्द करावे व वडिलोपार्जित मालमत्तेत आपल्याला व मुलीना हक्क मिळावा, अशी मागणी या मुलाने केली आहे.दरम्यान, एकीकडे शासन स्त्री-पुरु ष समानतेसाठी प्रयत्न करीत असताना, ग्रामीण भागात मात्र अजूनही या बाबीचा प्रसार आणि प्रबोधन झाले नसल्याने आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात आहे व त्यांना त्यांच्या अधिकारापासून डावलले जात आहे. केवळ मुली असल्याने त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेतील अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याची बाब समोर आल्याने तालुक्यातील महिला संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. (वार्ताहर)