शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला जाग आली, पण अर्धवट!

By admin | Updated: December 17, 2015 00:25 IST

कृषिनगर उद्यान : काम अपूर्ण ठेवून कर्मचारी माघारी

नाशिक : कृषिनगर येथील खुल्या जागेतील उद्यानात वाढलेले तण आणि तुटक्या खेळण्या याबाबत लोकमतमध्ये वृत्त येताच महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठविले. परंतु वर वर तण काढण्याच्या प्रकारामुळे उद्यानाची बकाल अवस्था कायम आहे. त्यामुळे पालिकेने वरवरची कारवाई करून काय साध्य केले असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात, पालिकेने हे काम सुरू केले असून दोन दिवसात कृषिनगर येथे समाज मंदिर, संत ज्ञानेश्वर वाचनालय आणि दत्तमंदिर असून उद्यानही साकारले आहे. परंतु खुली जागा दिसली की उद्यान साकारायचे नंतर त्याची देखभाल दुरुस्ती करायचीच नाही, या महापालिकेच्या प्रकारामुळे शहरातील बहुतांशी उद्यानांची जी अवस्था आहे, तशीच अवस्था कृषिनगर उद्यानाची झाली. यासंदर्भात लोकमतने उद्यानातील वाढलेले गवत, झुडपे आणि खेळण्यांची झालेली दुरवस्था यावर प्रकाश टाकला. इतकेच नव्हे तर नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याची हतबलतादेखील व्यक्त केली. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेच्या वतीने याठिकाणी कर्मचारी पाठविण्यात आले आणि झाडांची छाटणी करतानाच काही प्रमाणात तण काढण्यात आले. परंतु सर्व काम न करताच कर्मचारी अवघ्या काही तासातच माघारी गेल्याने उद्यानाची दुरवस्था कायम आहे. यासंदर्भात पालिकेच्या सूत्रांनी काम सुरूच राहील आणि दोन ते तीन दिवसात उद्यान सुस्थितीत राहील असा दावा केला आहे. (प्रतिनिधी)