शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणापाडा येथे मातेसह मुलांची आत्महत्त्या

By admin | Updated: June 26, 2017 00:45 IST

नाशिक : पतीच्या आत्महत्येस चार महिने पूर्ण होत नाही तोच पत्नीने आपल्या मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे रविवारी (दि़२५)उघडकीस आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पतीच्या आत्महत्येस चार महिने पूर्ण होत नाही तोच पत्नीने आपल्या दहा व बारा वर्षांच्या मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे रविवारी (दि़२५) दुपारच्या सुमारास उघडकीस आली़ हौसाबाई गिरीधर लोखंडे (वय ३६), मुलगा नीरज गिरीधर लोखंडे (वय १२) व मुलगी माधुरी गिरीधर लोखंडे (वय १०) अशी आत्महत्या केलेल्या आई आणि मुलांची नावे आहेत. दरम्यान, जमिनीच्या हव्यासापोटी चुलत सासऱ्यांनी व दिरांनी घातपात केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या वडिलांनी केला आहे़हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणापाडा येथील हौसाबाई लोखंडे व तिच्या दोन लहान मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिळाली़ त्यानुसार हरसूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक एम़ बी़ घुगे हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले़ मयत हौसाबाई लोखंडे यांचे वडील जयराम बाळू धनवले (रा़ चिखलपाडा, ता़ त्र्यंबकेश्वर, जि़ नाशिक) यांनी ही आत्महत्त्या नसून घातपाताचा आरोप केला आहे़  चार महिन्यांपूर्वीच हौसाबाईचा पती गिरीधर लोखंडे याने आत्महत्त्या केली होती़ यानंतर या मुलांसाठी शालेय साहित्य तसेच अडीच हजार रुपये त्यांनी दिले होते़ हौसाबाईचे चुलत सासरे व दीरांनी दहा एकर जमिनीसाठी मुलगी व तिच्या दोन मुलांचा घातपात केल्याचा आरोपही धनवले यांनी केला आहे़  दरम्यान, या तिघांच्या आत्महत्त्येचे कारण समजले नसून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे़ या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ आत्महत्त्या नव्हे खूनचमुलगी व तिच्या दोन्ही मुलांनी गळफास घेतलेली जागा अरुंद तसेच दोरीही कमकुवत होती़ मुलीचा मृतदेह तर अक्षरश: गुडगे खाली टेकलेल्या अवस्थेत होता़ तसेच पायाखालील कांदेही तसेच होते़ गळफास घेणारा माणूस किमान हातपाय तरी झाडतो व त्यामुळे घरातील कांदे इतरत्र पसरायला हवे होते मात्र कांदे तसेच पडलेले होते व अंतरही कमी होते़ त्यामुळे हा आत्महत्त्येचा नाही तर खूनाचा प्रकार आहे़ जमिनीच्या कारणावरून तिच्या चुलत सासरच्यांनीच हा प्रकार केला आहे़ पोलिसांनी योग्य तपास करून न्याय द्यावा़ (फोटो :- २५ ठाणापाडा सुसाईड २ या नावाने सेव्ह केला आहे)- जयराम धनवले, आत्महत्त्या केलेल्या महिलेचे वडील़शवविच्छेदन अहवालानंतर निर्णयठाणापाडा येथील घरामध्ये या तिघांचेही गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले असून ते शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत़ प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल़ - एस़एस़वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पेठ़