शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

करंजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:22 IST

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी (दि. ७) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाचा ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी (दि. ७) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाचा ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.  रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रामदास कोटकर यांच्या वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात घोडा गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी येथूनच जवळच असलेल्या करंजगाव भेंडाळी शिवेवर रात्री बाळासाहेब देवराम राजोळे यांच्या वस्तीवर मेंढपाळ प्रभाकर फटांगरे यांनी आपल्या कुटुंबासह कांद्याच्या शेतात राहुटी दिली होती. राहुटीच्या शेजारीच असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांचा ५ वर्षीय प्रसाद नावाचा मुलगा राहुटीजवळच खेळत होता. आई काही अंतरावर असताना दबा धरलेल्या बिबट्याने प्रसादला उचलून नेले. यात गंभीर जखमी झालेल्या प्रसादला तत्काळ नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वनविभागाने रात्री उशिराने पिंजरा लावला; मात्र दोन दिवसात दोन घटना घडल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुस्त वनविभाग आणि प्रशासन यांच्यामुळे निरपराध प्रसादला बिबट्याचे शिकार व्हावे लागल्याची भावना शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.बिबट्याने प्रसादला उसाच्या शेतात नेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने आजूबाजूच्या शेतकºयांनी उसात शोध घेतला. मात्र बिबट्याने हुलकावणी देत प्रसादला दूर घेऊन गेला. त्यामुळे तब्बल अर्धा ते पाऊणतासानंतर प्रसाद जखमी अवस्थेत आढळून आला.

टॅग्स :leopardबिबट्या