निफाड : तालुक्यातील सायखेडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात सार्थक महेश सोळसे (३) हे बालक ठार झाल्याची घटना घडली.सायखेडा येथील सोनगाव ते गंगानगर या रस्त्यावर सागर रामनाथ कुटे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात महेश पोपट सोळोसे हे सालदार म्हणून काम करतात. शुक्र वारी कुटे यांच्या शेतात सार्थक सोळोसे याची आई व काही महिला मजूर काम करीत होत्या. तेव्हा सार्थक व अजून एक बालक या महिलांच्या जवळ खेळत होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेऊन सार्थकच्या मानेजवळ पकडून त्याला वेगाने उसात घेऊन गेला ही घटना सार्थकच्या आईने व महिलांनी डोळ्यादेखत पाहिल्यानंतर त्यांनी मदतीसाठी प्रचंड आरडाओरडा केला आरडाओरडा एकूण शेजारी शेतवस्ती वस्तीतील २५० ते ३०० नागरिकांनी धाव घेतली व संपूर्ण ३ ते ४ एकर ऊस पिंजून काढला अवघ्या २० मिनिटात दुर्दवी सार्थक मृत अवस्थेत सापडला. मृत सार्थकचे शवविच्छेदन निफाड येथील उपजिल्हारु ग्णालय करण्यात आले. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने सायखेडा येथे कुटे वस्ती येथे जाऊन घटनेचा पंचनामा केला व बिबट्यास जेरबंद करण्यासाठी कुटे याच्या शेतात पिंजरा लावला. मृत सार्थला एक वर्षाची बहीण आहेयापूर्वी निफाड तालुक्यातील तारु खेडले,चापडगाव , शिंगवे ,शिवरे , येथे बिबट्याने लहान बालकांवर हल्ले करून ठार केलेले आहे . आजच्या घटनेने संपूर्ण गोदा काठ हादरून गेला आहे. निफाड तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढतच असून त्याचें शेळ्या ,कुत्रे यांच्या वरील हल्ले वाढले आहे तर यापूर्वी कुरडगाव,कोठूरे ,चांदोरी ,नागापूर येथे बिबट्यांनी मोटरसायकल स्वारावर हल्ले करून त्यांना जखमी केले आहे. तालुक्यात उसाच्या क्षेत्रात बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार
By admin | Updated: September 24, 2016 01:50 IST