शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक तालुक्यात चिकनगुनियाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:55 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दिसून आली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे दुर्लक्ष : २०० हून अधिक जणांना हात-पायांना सूज

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दिसून आली.या आजारांबद्दल जिल्हा किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस इरफान शेख यांनी आवाज उठविला. त्यानंतर आरोग्य विभाग व प्रशासनातील अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा व आजाराबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्यात आली. कोणत्याही आजारासाठी तपासणी करून योग्य निष्कर्ष काढणे व त्यावर उपाययोजना करणे, काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव परिसरात रुग्णांना गुडघ्याला, हात-पायाला सूज येणे ही लक्षणे दिसून येत आहेत. वास्तविक त्याच वेळेस तालुका आरोग्य विभागाने त्वरित निदान व उपचाराची कार्यवाही केली असती तर दोनशेपेक्षा जास्त रुग्ण झालेच नसते.दरम्यान, सध्या घरोघर सर्वेक्षण करणे, आपत्कालीन पथक तयार करून २४ तास सुरू ठेवणे, बाधित रुग्णांवर उपचार करणे याबरोबरच इतरही सूचना जसे की कोरडा दिवस पाळणे, घरातील पाणी साठविण्याची भांडी कोरडी करणे अशा सूचना करण्यात आल्या. पुढील दहा दिवसांत साथ नियंत्रित होणे अपेक्षित आहे. तसेच शेजारच्या गावांमध्येही या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, गटविकास अधिकारी किरण जाधव, नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, मिथुन राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, सरपंच लक्ष्मण वाघेरे, उपसरपंच हेमराज महाले, ग्रामसेवक बी. टी. सूर्यवंशी, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जाधव, किरण तरवारे, दिलीप तरवारे, संजय महाले, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ. नंदकुमार नवाळे याबरोबरच आशा कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती,आरोग्य कर्मचारी आदी पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीच आम्ही संयुक्त दौरा करून बरोबरीच्या डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी असे रुग्णांचे सर्वेक्षण करून हा प्रकार चिकन गुनियाचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. चिकनगुनिया बरा होण्यास वेळ लागतो. जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य औषधाने हा आजार बरा होतो.-डॉ. मोतीलाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :hospitalहॉस्पिटलtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर